शिवसेनेचे उपनेते आणि मुंबई महानगरपालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याभोवती कारवाईचा फास आवळताना दिसत आहे. प्राप्तिकर विभागाने यशवंत जाधव यांच्या आणखी ४१ संपत्ती जप्त केल्या आहेत. यामध्ये यशवंत जाधव यांचा वांद्रयातील पाच कोटींचा फ्लॅट आहे. २५ फेब्रुवारीला प्राप्तिकर विभागाने माजगाव येथील त्यांच्या निवासस्थानी छापा टाकला होता. तेव्हापासून सुरु असलेल्या या तपाासदरम्यान यशवंत जाधव यांच्या अनेक संपत्तींवर टाच आली आहे.
२०१८ ते २०२२ दरम्यान स्थायी समिती अध्यक्ष असताना यशवंत जाधव यांनी बेकायदेशीर मार्गाने मिळवलेल्या पैशांच्या माध्यमातून ही संपत्ती खरेदी केली असावी असा प्राप्तिकर विभागाला संशय आहे.
यशवंत जाधव यांच्या डायरीतील ‘मातोश्री’ उल्लेखावर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
प्राप्तिकर विभागाने यशवंत जाधव यांचे मेहुणा विलाश मोहिते आणि पुतण्या विनीत जाधव यांनाही जबाब नोंदवण्यासाठी बोलावलं आहे. हे दोघेही यशवंत जाधवांचे आणि त्यांच्या कंपनीचे आर्थिक व्यवहार सांभाळत होते. विलाश मोहिते यशवंत जाधव यांचे पालिकेशी संबंधित आर्थिक व्यवहार पाहत असताना विनीत Newshawk Multimedia Pvt Ltd. कंपनीत वादग्रस्त व्यावसायिक बिमल अग्रवाल यांच्यासोबत संचालक होता.
यशवंत जाधव यांनी भायखळामधील बिलाकडी चेंबर्समधील (पगडी सिस्टम असणारी इमारत) ३१ फ्लॅट्सचे भाडेकरु हक्क विकत घेतले होते. Newshawk Multimedia Pvt Ltd. कंपनीच्या नावे या भाडेकरुंना थेट रोख रक्कम देण्यात आली होती.
जप्त करण्यात आले आहेत त्यापैकी २६ फ्लॅट Newshawk Multimedia Pvt Ltd कंपनीच्या नावे नोंद आहेत. याशिवाय भायखळामधील इम्पिरियल क्राउन हॉटेल आहे जे यशवंत जाधव यांनी आपल्या सासूच्या नावे खरेदी केलं होतं. तसंच वांद्रे येथील फ्लॅट आणि याशिवाय यशवंत जाधव प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे हाताळणाऱ्या १४ संपत्ती आहेत.