करदात्याकडून लाच मागून ती स्वीकारल्याप्रकरणी प्राप्तिकर खात्याच्या माजी सहाय्यक आयुक्ताला दोषी ठरवत केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विशेष न्यायालयाने सोमवारी पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.
राजीव कुमार असे या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. मार्च १९९८ मध्ये त्याने तक्रारदार करदात्याकडून २५ हजार रुपयांची लाच मागितली होती, असा आरोप सीबीआयने त्याच्यावर ठेवला होता. १९९५-९६ या आर्थिक वर्षांच्या कर दाव्याबाबतच्या तडजोडीचा प्रस्ताव कुमार याने तक्रारदारासमोर ठेवला होता. तडजोड म्हणून त्याने तक्रारदाराकडे २५ हजार रुपयांची लाच मागितली होती. परंतु तक्रारदाराने त्याच्याविरुद्ध सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली.  
या तक्रारीनंतर सापळा रचून सीबीआयने कुमार याला लाच स्वीकारल्याप्रकरणी अटक केली होती. कुमार याच्यावर सीबीआयने २००० मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याअंतर्गत आरोपपत्र दाखल केले होते.       

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा