प्राप्तिकर विभागामार्फत स्टेनोपदासाठी मुलुंड येथे घेण्यात आलेली परीक्षा मनसेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी उधळून लावली. परीक्षेसाठी बसलेले सर्व उमेदवार परप्रांतीय असल्याचा आरोप करीत मनसे कार्यकर्त्यांनी परीक्षा रद्द करण्याची मागणी केली होती. ती मान्य करण्यात आली. मुलुंडमधील महापालिकेच्या कार्यालयामध्ये शनिवारी प्राप्तिकर विभागाकडून स्टेनोच्या पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी आलेले उमेदवार अमराठी असल्याची माहिती मिळताच मनसेचे विभागाध्यक्ष सत्यवान दळवी आणि मनसे कार्यकर्त्यांनी परीक्षा नियंत्रकांना घेराव घातला. त्यानंतर परीक्षा नियंत्रकांनी ही परीक्षा रद्द केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा