मुंबई : पावसाच्या तडाख्यात मुंबईतील ठिकठिकाणच्या रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्याच वेळी गोराई जेट्टी येथे नव्याने बांधण्यात आलेल्या गुळगुळीत रस्त्यावर वाहने घसरून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे.  या रस्त्यावर केवळ दुचाकीच नव्हे तर चारचाकी वाहनेही घसरून अपघात होत आहेत. स्थानिक रहिवाशांनी केलेल्या तक्रारींची दखल घेऊन मुंबई महानगरपालिकेने मंगळवारी सकाळी रस्त्याचा गुळगुळीतपणा कमी करण्याचे काम हाती घेतले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गेल्या काही दिवसांपासून कोकळणाऱ्या पावसामुळे गोराई जेट्टी टी जंक्शन या नव्या रस्त्यावर वाहने घसरत असल्याचे आढळून आले होते. वाहने घसरून रस्त्याच्या कडेला जाऊन आदळत होती. गेल्या आठवड्यात तीन वाहनांचा अपघात झाला होता.  याप्रकरणी गोराई गावातील रहिवाशांनी बैठक आयोजित करून मुंबई महानगरपालिकेकडे तक्रारही दाखल केली. दोन दिवसांपूर्वी मुंबई महानगरपालिकेची कचरा वाहून नेणारी गाडीही या रस्त्यावर घसरून अपघात झाला होता. त्यानंतर मुंबई महानगरपालिकेची यंत्रणा कामाला लागली असून मंगळवारी सकाळी ७  वाजताच या रस्त्यावर वाहनांची गती नियंत्रीत राहावी, वाहने घसरू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आली. यासाठी ‘झिरो पास माईलिंग’ यंत्र सकाळी ७ वाजताच येथे पोहोचेले असून या यंत्राच्या मदतीने रस्त्याच्या पृष्ठभागावरील गुळगुळीतपणा कमी करण्यात येत आहे. यामुळे सध्या वाहन घसरून होणारे अपघात टाळता येतील, असे मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.