मुंबई : मुंबईत स्वाईन फ्लू आणि डेंग्यूच्या रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. हिवतापाच्या रुग्णांमध्येही मोठी वाढ होत असून ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात स्वाईन फ्लूचे २५, तर डेंग्यूचे २७ नवे रुग्ण आढळले आहेत. त्याचबरोबर हिवतापाचेही ९७ रुग्ण आढळले आहेत. ऑगस्टमध्ये आतापर्यंत स्वाईन फ्लूचे १६३ रुग्ण आढळले आहेत.

हेही वाचा : मुंबईत पुन्हा क्लिन अप मार्शल सक्रिय होणार, सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा

हेही वाचा : ‘आरे वाचवा’साठी रविवारी सायकल रॅली

मुंबईत करोनाबरोबरच इतर आजारांचेही प्रमाण वाढतच आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच हिवताप, लेप्टो, डेंग्यू, गॅस्ट्रो,  कावीळच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली होई लागली. दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यातही तशीच परिस्थिती आहे. हिवताप, स्वाईन फ्लू, डेंग्यू या आजारांच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत स्वाईन फ्लूचे १६३ रुग्ण आढळले आहेत. तर हिवतापाच्या रुग्णांची आतापर्यंतची संख्या ५०९ वर पोहोचली आहे. मात्र आतापर्यंत एकही रुग्ण या आजारांमुळे मृत पावल्याची नोंद नाही. जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. जुलैमध्ये डेंग्यूचे ६१ रुग्ण आढळले होते, तर ऑगस्टमध्ये आतापर्यंत डेंग्यूच्या रुग्णांची संख्या १०५ झाली आहे.

स्वाईन फ्लूची लक्षणे

सर्वसामान्यत: स्वाइन फ्लू हा किरकोळ सर्दी-खोकल्याचा आजार आहे. तीव्र ताप, कोरडा खोकला, नाकातून पाणी वाहणे, शिंका येणे, घशामध्ये खवखव होणे, थकवा आणि काही वेळेस जुलाब किंवा पोटदुखी अशी लक्षणे या आजारात आढळतात. सर्वसाधारणपणे चार ते पाच दिवसांत हा आजार बहुसंख्य रुग्णांमध्ये स्वत:हूनच बरा होतो. काहीच व्यक्तींमध्ये हा उग्र स्वरूप धारण करतो. गुंतागुंतीच्या आजारात मात्र काही विशिष्ट लक्षणे दिसतात. याला सूचक किंवा धोकादायक लक्षणे म्हणतात. यात छातीत दुखणे, खोकल्यातून रक्त पडणे, दम लागणे, अतितीव्र ताप, शुष्कता (डिहायड्रेशन), बेशुद्धावस्था ही लक्षणे दिसायला लागतात. 

आजार    ……. ऑगस्ट महिन्यातील रुग्ण …… जानेवारीपासून आतापर्यंतचे एकूण रुग्ण

हिवताप   ………      ५०९                …..           २३१५

लेप्टो     ………        ४६                …..             १४६

डेंग्यू     ………       १०५               ……             २८९

गॅस्टो     ……..       ३२४               ……            ३९०९

कावीळ   …….         ३५               ……              ३५३

चिकुनगुन्या ….           २              ……                 ९

स्वाईन फ्लू …..        १६३             ……               २७२

Story img Loader