लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : डेंग्यू, हिवताप, चिकुनगुन्या या आजारांनी ग्रस्त रुग्ण वर्षभरात सातत्याने वाढताना दिसत आहेत. मात्र यंदा इन्फ्लूएंझाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या यंदा जवळपास दुपटीने वाढली आहे. यंदा राज्यात ५७ रुग्णांचा इन्फ्लूएंझाने मृत्यू झाला आहे.

attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Greater Noida
Greater Noida : डोळ्यावर शस्त्रक्रिया न करताच हॉस्पिटलने ४५ हजार उकळले; दुसऱ्या डॉक्टरनी तपासल्यानंतर झालं उघड
Advice from health experts due to the increase in diseases as the cold weather increases Pune print news
थंडीचा कडाका वाढताच आजारांमध्ये वाढ! बदलत्या हवामानाचा परिणाम; आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या…
Mother Saved Her Daughters Life Who Had Drowned In The Sea Thrilling Video Went Viral
एक लाट अन् माय-लेकींचा थेट मृत्यूशी सामना; नेमकं काय घडलं? Shocking Video पाहून अंगाचा थरकाप उडेल
Dengue, chikungunya fever, Dengue Pune,
दिवाळीनंतर पुण्यात डेंग्यू, चिकुनगुन्याचा ताप अचानक कमी! जाणून घ्या कारणे
Two houses including shop damaged in fire in Fernandiswadi
नाशिक : फर्नांडिसवाडीतील आगीत दुकानासह दोन घरांचे नुकसान
Loksatta explained Why has the central government recommended the influenza vaccine
केंद्र सरकारने इन्फ्लूएन्झा लशीची शिफारस का केली आहे? भारताला फ्लूचा विळखा?

वातावरणात होणाऱ्या बदलांनुसार संसर्गजन्य आजार वाढत असतात. साधारणपणे हिवाळ्यामध्ये इन्फ्लूएंझाचे रुग्ण सापडतात. मात्र यंदा संपूर्ण वर्षभर राज्यात इन्फ्लूएंझाचे रुग्ण अधूनमधून सापडत होते. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यामध्ये १ जानेवारी ते १८ नोव्हेंबर या कालावधीत २१ लाख ३३ हजार ६९५ संशयित रुग्ण सापडले, यापैकी दोन हजार ३२४ बाधित रुग्ण सापडले.

आणखी वाचा-समाजमाध्यमावरील दागिन्यांच्या छायाचित्रावरून चोरीची उकल, घरकाम करणाऱ्या महिलेला अटक

गतवर्षी याच कालावधीत तीन हजार इन्फ्लूएंझाचे बाधित रुग्ण सापडले होते. त्याचप्रमाणे गतवर्षी इन्फ्लूएंझामुळे ३६ रुग्णांचा मृत्यू झाला. मात्र या वर्षी ५७ रुग्णांचा इन्फ्लूएंझाने मृत्यू झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत मृत्यूच्या संख्येत जवळपास दुपटीने वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. इन्फ्लूएंझाने मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये ‘एच१ एन१’ने एका रुग्णाचा, तर ‘एच३ एन२’ने ५६ रुग्णांचा मृत्यू झाला. इन्फ्लूएंझाने संशयित असलेल्या जवळपास पाच हजार ७५१ रुग्णांना ओसेलटेमिवीर हे औषध देण्यात आले. तसेच ‘एच१ एन१’ आणि ‘एच३ एन२’ या इन्फ्लूएंझाने बाधित २५ रुग्णांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

सतत खोकला येणे, थंडी येणे, ताप येणे ही ‘एच१ एन१’ आणि ‘एच३ एन२’ची मुख्य लक्षणे आहेत. याशिवाय काही रुग्णांना वास न येणे, सतत थकवा जाणवणे, स्नायू दुखणे, घशामध्ये सतत खवखव होणे, सतत नाक वाहणे अशी महत्त्वाची लक्षणे असतात. अशी लक्षणे दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये.

आणखी वाचा-भाभा अणुशक्ती संशोधन केंद्र परिसरात ‘कॅमेरा ट्रॅपिंग’ संवर्धन आणि अभ्यासासाठी विशेष उपक्रम

या नागरिकांना अधिक धोका

लहान मुले, महिला आणि वृद्ध यांना अधिक धोका असतो. त्याचबरोबर हृदय किंवा फुफ्फुसचा आजार, मधुमेह अशा सहव्याधीने त्रस्त आणि लठ्ठपणा असलेल्या व्यक्तींना इन्फ्लूएंझाचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. यांसारखी लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा, असा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येत आहे.

काय आहे इन्फ्लूएंझा

‘एच१ एन१’ आणि ‘एच३ एन२’ दोन्ही इन्फ्लूएंझाचे उपप्रकार आहेत. ‘एच१ एन१’ सामान्यतः स्वाइन फ्लू म्हणून ओळखला जातो. हा एक संसर्गजन्य आजार आहे. ‘एच३ एन२’ हा हाँगकाँग फ्लू या नावाने ओळखला जातो. या दोघांच्या लक्षणांमध्ये साम्य आहे.