मुंबई: रुळालगतच्या झोपडपट्ट्यांमधून मध्य आणि पश्चिम उपनगरीय लोकल, मेल-एक्स्प्रेस गाड्यांवर दगडफेकीच्या घटना सातत्याने घडत असून या घटनांमध्ये प्रवासी जखमी होत आहेत. लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२१ पासून आतापर्यंत झोपडपट्ट्यांमधून लोकलवर दगडफेकीच्या २४ घटना घडल्या असून आतापर्यंत नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच २०२१ च्या तुलनेत २०२२ मध्ये दगडफेकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. 

मुंबईत रेल्वे मार्गालगत मोठया प्रमाणावर झोपडपट्ट्या उभ्या राहिल्या असून या झोपडपट्ट्यांमुळे रेल्वे आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या झोपडपट्ट्यांमधून काही अज्ञात व्यक्ती लोकल किंवा मेल-एक्स्प्रेसवर दगडफेक करीत असून या घटनांमध्ये प्रवाशांच्या डोक्याला, हाताला किंवा डोळ्याला गंभीर जखमा झाल्या आहेत. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मुंबईच्या हद्दील २०२१ मध्ये अशा प्रकारच्या नऊ घटना घडल्या असून त्यात मध्य रेल्वेवर आठ घटनांचा समावेश आहे. आतापर्यंत यापैकी दोनच घटनांची उकल करण्यात यश आले असून लोहमार्ग पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
washim assembly constituency dispute within mahayuti
महायुतीमध्ये असंतोषाची दरी, बंडखोरीमुळे वाशीम जिल्ह्यात वाद वाढले; कारवाईत पक्षपातीपणा?
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
vip roads for ordinary pune residents
लोकजागर : सामान्य पुणेकरांना ‘व्हीआयपी’ रस्ते मिळतील का?
Attempted murder of laborer due to argument over drinking
दारू पिताना झालेल्या वादातून मजुराचा खुनाचा प्रयत्न, भिडे पूल परिसरातील घटना
Municipal Commissioner Bhushan Gagrani warns Law Department not to delay in court cases
न्यायालयीन प्रकरणांत दिरंगाई नको, महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांचा विधि विभागाला इशारा
Pune Drunk drivers, proposal to suspend licenses,
पुणे : मद्यपी चालकांची ‘झिंग’ उतरणार, अडीच हजार जणांवर कारवाई; ५०० परवाने निलंबित करण्याचा प्रस्ताव

हेही वाचा >>> Maharashtra News Live : शिंदे सरकारचा भाजपाच्या सरकारकडे जाणूनबुजून कानाडोळा, राऊतांचा आरोप; राज्य, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर

मुंबईच्या हद्दीत २०२२ मध्ये रेल्वेवरील दगडेफकीच्या घटनामध्ये वाढ झाली आहे. याप्रकरणी एकूण १५ गुन्हे दाखल झाले असून यापैकी १० गुन्हे मध्य रेल्वेवर घडले आहेत. २०२२ मध्ये एकूण घडलेल्या गुन्ह्यांपैकी पाच गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून सात आरोपींना अटक करण्यात यश आले आहे. ठाणे, तसेच ठाकुर्ली – कल्याण, उल्हासनगर – अंबरनाथ रेल्वे स्थानकांदरम्यान, नेरूळ – जुईनगरदरम्यान, वांद्रे रेल्वे स्थानकादरम्यान अशा प्रकारच्या सर्वाधिक घटना घडल्या आहेत. ही ठिकाणे संवेदनशील बनली आहेत.

हेही वाचा >>> मुंबई: एमसीएच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास उच्च न्यायालयाचा नकार

टिटवाळा-आंबिवली रेल्वे स्थानकांदरम्यान सीएसमटीच्या दिशेने जाणाऱ्या एक्स्प्रेसवर दगडफेक करण्यात आली होती. या घटनेत एका ५५ वर्षीय महिलेच्या डोळ्याला गंभीर जखम झाली होती. तर ७ नोव्हेंबर रोजी ठाणे – कळव्यादरम्यान लोकलवर झालेल्या दगडफेकीत एक पुरुष प्रवासी आणि त्यानंतर वांद्रे स्थानकाजवळ लोकलवर झालेल्या दगडफेकीत एक महिला प्रवासी जखमी झाली होती.

दगफेक घटना रोखण्यात अपयश

रेल्वे गाड्यांवर होणारी दगडफेक रोखण्यात रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलिसांना अपयश येत आहे. दगडफेकीच्या घटना रोखण्यासाठी रुळाजवळील खांब किंवा झोपड्याजवळ सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय मध्य रेल्वे सुरक्षा दलाने घेतला आहे. मात्र ही सुरक्षा योजना कागदावरच राहिली आहे. रुळाजवळ लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी तैनात असतात. मात्र त्यांचाही धाक लोकलवर दगडफेक करणाऱ्या समाजकंटकांना राहिलेला नाही.