मुंबई: मुंबई शहर, तसेच उपनगरांत कमाल तापमानात वाढ झाल्याने उन्हाचा ताप वाढला आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीस थंडी पडली होती. यामुळे मुंबईकरांना मागील काही दिवस दिलासा मिळाला होता. दरम्यान, पुढील दोन-तीन दिवसांत मुंबईचे कमाल तापमान ३५-३६ अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काही दिवसांपूर्वी कमाल तसेच किमान तापमानात घसरण झाल्यामुळे गारठा अनुभवायला मिळत होता. त्यानंतर मात्र उन्हाचा चटका वाढल्याने झळा आणि उकाडा तापदायक ठरत आहे. उत्तर छत्तीसगडपासून तेलंगणा ते उत्तर कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. यामुळे पुढील काही दिवसांत उन्हाचा तडाखा आणखी वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात बुधवारी ३०.६, तर सांताक्रुझ केंद्रात ३१.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.