पाऊस ओसरल्याने मुंबईतील तापमान वाढत आहे. पावसामुळे शहरातील तापमान नियंत्रणात होते. मात्र ऑगस्टमध्ये पावसाचे प्रमाण घटल्यामुळे तापमानात वाढ झाली आहे. गेल्या सहा दिवसात शहरातील तापमानात चार अंशांनी वाढ झाली आहे. त्यातच हवेत बाष्पाचे प्रमाण अधिक असल्याने काहिली अधिक जाणवत आहे. कुलाबा आणि सांताक्रूझ या दोन्ही ठिकाणी हवामान नोंदीनुसार कमाल तापमानात दरदिवशी वाढ झाली आहे. पुढील तीन दिवस पावसाच्या तुरळक सरी पडण्याचा अंदाज मुंबई वेधशाळेने वर्तवल्याने तापमान घटण्याची शक्यता नाही.
तापमान अंश सेल्सिअसमध्ये (कुलाबा)
२९ ऑगस्ट – ३२.२
२८ ऑगस्ट – ३१.९
२७ ऑगस्ट – ३१.७
२६ ऑगस्ट – २८.८
२५ ऑगस्ट – २७.८
२४ ऑगस्ट – २८.६

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा