मुंबई : गेल्या दोन महिन्यांपासून मुंबईची हवा खालावलेली असून अनेक ठिकाणी ‘वाईट’ ते ‘अतिवाईट’ हवेची नोंद झाली आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर या काळात मुंबईतील हवेत पीएम २.५ धूलीकणांमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. वातावरण फाऊंडेशनने याबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. मुंबईच्या हवेत नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात १२ ठिकाणी पीएम २.५ धूलीकणाचे प्रमाण केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक असल्याचे निदर्शनास आल्याचे या अहवाला नमुद करण्यात आले आहे. मुंबईत करण्यात आलेल्या निरीक्षणनुसार ६१ पैकी ५० दिवस तब्बल १२ ठिकाणी पीएम २.५ च्या धूलीकणांची मात्रा अधिक नोंदली गेली. प्रामुख्याने बोरिवली पूर्व, मालाड पश्चिम, वांद्रे – कुर्ला संकुल आणि नेव्ही नगर, कुलाबा या परिसरात पीएम२.५ धूलीकणाचे प्रमाण अधिक होते. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत सर्वाधिक हवा प्रदूषण नोंदवले गेल्याचेही या अहवालात नमुद करण्यात आले आहे.

पीएम २.५ या अतिसूक्ष्म धूलीकणाचा कणाचा व्यास २.५ मायक्रोमीटर किंवा त्याहून कमी असतो. पीएम २.५ ची मात्रा जास्त असते तेव्हा धुरक्याचे किंवा धूलीकणांचे प्रमाण वाढून दृश्यमानतेची पातळी घसरते. हवेतील पीएम २.५ हे धूलीकण अतिघातक असतात. हे कण श्वास घेताना सहज नाक आणि तोंडावाटे शरीरात प्रवेश करतात. हे धूलीकण हृदयविकाराचा झटका, दमा तसेच श्वसनाच्या इतर समस्या निर्माण करतात.

bmc impose waste management charges in Mumbai
मुंबईत कचऱ्यावर साडेसात हजारांपर्यंत शुल्क; खर्च वाढल्याने पालिकेकडून प्रस्ताव
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
issue of Illegal garbage dump at Gaimukh area
गायमुख परिसरात बेकायदा कचराभुमी ? राष्ट्रीय हरित लवादाने बजावली पालिकेला नोटीस, महिनाभरात स्पष्टीकरण देण्याचे आदेश
PMC News: महापालिकेचे १०० सफाई कर्मचारी जाणार इंदूरला हे आहे कारण !
BMC Budget 2025 Latest Updates in Marathi, mumbai municipal corporation budget update withdraw of reserve fund charges on garbage
BMC Budget 2025 : पालिका राखीव निधीतून १६ हजार कोटी काढणार? वाढत्या खर्चामुळे महसूल वाढीसाठी धडपड, कचरा शुल्कही लावणार
BMC Budget 2025 Live Updates
कचरा संकलन शुल्काचा मुंबईकरांवर भार? महापालिकेचा आज अर्थसंकल्प
water supply cut in mumbai news
मुंबईत बुधवारी, गुरुवारी पाणीपुरवठा बंद
Ambuja Cements Maratha Limestone mine in Lakhmapur Korpana taluka will cause severe pollution affecting nearby villages
चंद्रपूर : अंबुजा सिमेंटच्या लाईमस्टोन खाणीमुळे प्रदूषणात वाढ; दहा ते पंधरा गावांना…

हेही वाचा : पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाचे पात्रता निकष शिथिल, पर्सेंटाईल १५ टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा राष्ट्रीय परीक्षा मंडळाचा निर्णय

दरम्यान, निर्माण परिस्थितीवर तात्काळ उपाययोजना करणे आवश्यक असून बोरिवली पूर्व, मालाड पश्चिम, वांद्रे – कुर्ला संकुल आणि कुलाबा यासारख्या क्षेत्रांसाठी विशिष्ट कृती योजना विकसित करावी, तसेच बांधकामस्थळांवर धूळ नियंत्रण उपायांची कठोर अंमलबजावणी करावी, असे वातावरण फाऊंडेशनने या अहवालात सूचित केले आहे. यापूर्वी ‘रेस्पायर लिव्हिंग सायन्सेस’ने सादर केलेल्या ‘टूवर्डस क्लीअर स्काइज २०२५’ या अहवालातही मुंबईत पीएम २.५ धूलीकणांमध्ये पाच वर्षांत वाढ झाल्याचे नमुद करण्यात आले होते. पीएम२.५ धूलीकणांमध्ये २०१९ पासून २.६ टक्क्यांनी वाढ झाल्याचे या अहवालात म्हटले होते.

Story img Loader