मुंबई : गेल्या दोन महिन्यांपासून मुंबईची हवा खालावलेली असून अनेक ठिकाणी ‘वाईट’ ते ‘अतिवाईट’ हवेची नोंद झाली आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर या काळात मुंबईतील हवेत पीएम २.५ धूलीकणांमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. वातावरण फाऊंडेशनने याबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. मुंबईच्या हवेत नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात १२ ठिकाणी पीएम २.५ धूलीकणाचे प्रमाण केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक असल्याचे निदर्शनास आल्याचे या अहवाला नमुद करण्यात आले आहे. मुंबईत करण्यात आलेल्या निरीक्षणनुसार ६१ पैकी ५० दिवस तब्बल १२ ठिकाणी पीएम २.५ च्या धूलीकणांची मात्रा अधिक नोंदली गेली. प्रामुख्याने बोरिवली पूर्व, मालाड पश्चिम, वांद्रे – कुर्ला संकुल आणि नेव्ही नगर, कुलाबा या परिसरात पीएम२.५ धूलीकणाचे प्रमाण अधिक होते. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत सर्वाधिक हवा प्रदूषण नोंदवले गेल्याचेही या अहवालात नमुद करण्यात आले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा