लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : चेंबूर – जेकब सर्कल दरम्यान मोनो रेलने प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मोनो रेलच्या ताफ्यात नवीन मोनो गाडी दाखल झाली आहे. त्यामुळे मोनो रेलच्या २४ फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. मोनो रेलच्या एकूण फेऱ्यांची संख्या ११८ वरून १४२ फेऱ्यांवर पोहोचली आहे.

आणखी वाचा-राज ठाकरे यांना उच्च न्यायालयाचा दिलासा, १३ वर्षांपूर्वीचा गुन्हा रद्द

चेंबूर – जेकब सर्कल दरम्यान २० किमी लांबीची पहिली आणि एकमेव मोनो रेल मार्गिका मुंबईत कार्यान्वित आहे. मात्र ही मोनो रेल मार्गिका तोट्यात आहे. मोनो रेलला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी आणि या मार्गिकेवरील प्रवासी संख्या वाढविण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) विविध प्रयत्न करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मोनो रेलच्या गाड्या वाढविणे, फेऱ्या वाढविणे आणि वारंवारता वाढविणे यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यानुसार आता मोनोच्या ताफ्यात एका गाडीची भर पडली आहे. त्यामुळे आता मोनोच्या २४ फेऱ्या वाढल्या आहेत. मोनोच्या वारंवारतेत वाढ झाली आहे. आतापर्यंत दर १८ मिनिटाने धावणारी मोनो रेल आता दर १५ मिनिटांनी धावणार आहे. त्यामुळे मोनो रेल प्रवाशांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान, मोरे रेलच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आलेली मोनो रेल गाडी नादुरुस्त होती. ती दुरुस्त करून पुन्हा ताफ्यात समाविष्ट करण्यात आली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Increase in rounds of mono rail mumbai print news mrj
First published on: 10-11-2023 at 12:10 IST