मुंबई : सांताक्रूझ येथील व्ही.एन. देसाई रुग्णालयामधील सुरक्षा रक्षकांच्या संख्येत वाढ करण्यास मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी सकारात्मकता दर्शवल्यानंतर गुरुवारी दुपारी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन मागे घेतले. रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टर व कर्मचाऱ्यांना केलेल्या मारहाणीमुळे बुधवारपासून डॉक्टरांनी काम बंद आंदोलन पुकारले होते. यासंदर्भात गुरुवारी सकाळी मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी रुग्णालयाला भेट देऊन डॉक्टरांशी चर्चा केली.

वेळेपूर्वी प्रसूती झाल्याने आई व बाळाच्या जीवाला धोका असल्याची कल्पना रुग्णालयातील डॉक्टरांनी रुग्णांच्या नातेवाईकांना दिली होती. मात्र प्रसूतीनंतर प्रथम आईचा व दुसऱ्या दिवशी बाळाचा मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी व्ही.एन. देसाई रुग्णालयातील नवजात अतिदक्षता विभागातील (एनआयसीयू) डॉक्टर व कर्मचाऱ्यांना मारहाण केली. या प्रकरणी वाकोला पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली होती. मात्र याप्रकरणी रुग्णालय प्रशासनाने कठोर कारवाई करावी, तसेच सुरक्षा रक्षकांच्या संख्येत वाढ करावी अशी मागणी करीत रुग्णालयातील डॉक्टरांनी बुधवारपासून बाह्यरुग्ण विभाग बंद ठेवला. यामुळे बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या रुग्णाचे हाल झाले.

Maharani Laxmi Bai Medical College, in Jhansi district
Jhansi Hospital Fire : नर्सने काडीपेटी पेटवली अन्… १० अर्भकांचा जीव घेणाऱ्या झाशी रुग्णालयात आग कशी लागली?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
old womans dead body found in Mutha river police investigation underway
पुणे : मुठा नदी पात्रात ज्येष्ठ महिलेचा मृतदेह, पोलिसांकडून तपास सुरू
Absence of doctors other staff at Aarey hospital beds Tribal patients suffering for treatment Mumbai print news
आरे रुग्णालय रुग्णशय्येवर डॉक्टर, अन्य कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती; आदिवासी रुग्णांची उपचारांसाठी पायपीट
stomach cancer marathi news
पोटदुखीकडे करू नका दुर्लक्ष!
Deputy Commissioner Bhagyashree Navtake refusal to investigate multi-state credit union scam
बहुराज्यीय पतसंस्था घोटाळ्याच्या चौकशीला उपायुक्त नवटके यांच्याकडून सुरुवातीला नकार
Chennai Doctor Attack
Chennai : कॅन्सरग्रस्त महिलेच्या मुलाचा डॉक्टरवर चाकुने हल्ला; मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

हेही वाचा – आजपासून कारखान्यांची धुराडी पेटणार, जाणून घ्या साखर आयुक्तालयाचा निर्णय

डॉक्टरांनी रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग बंद ठेवल्याने मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी उपायुक्तांसह गुरुवारी सकाळी १० च्या सुमारात रुग्णालयाला भेट देऊन आंदोलनाला बसलेल्या डॉक्टरांशी चर्चा केली. रुग्णालयामध्ये मंजूर असलेल्या ५० पैकी फक्त १६ पदेच भरलेली आहेत. त्यामुळे रुग्णालयामध्ये सुरक्षा रक्षकांची निम्म्यापेक्षा जास्त पदे रिक्त आहे. अपुऱ्या सुरक्षा रक्षकांमुळे कार्यरत सुरक्षा रक्षकांवर कामाचा प्रंचड ताण पडत आहे. त्यामुळे रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे आंदोलनकर्त्या डॉक्टरांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच सुरक्षा रक्षकांची पदे तातडीने भरावी, अशी मागणी त्यांनी भूषण गगराणी यांच्याकडे केली.

आयुक्तांनी त्यांच्या मागणीची दखल घेत रुग्णालय प्रशासनाला तातडीने सुरक्षा रक्षक भरती करण्याचा प्रस्ताव पाठविण्याचे आदेश दिले. त्यानंतर आंदोलनकर्त्या डॉक्टरांनी आपले काम बंद आंदोलन मागे घेत दुपारी बाह्यरुग्ण विभाग सुरू केला, अशी माहिती व्ही. एन. देसाई रुग्णलयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जयराज आचार्य यांनी दिली. सलग दोन दिवस डॉक्टरांनी काम बंद आंदोलन केल्याने त्याचा मोठा फटका रुग्णांना बसला होता. बाह्यरुग्ण विभाग बंद असल्याने अनेक रुग्णांना रुग्णालयाच्या दारात येऊन परत जावे लागत होते.

हेही वाचा – मराठी मनोरंजनसृष्टीसह कला क्षेत्रावर आश्वासनांचा पाऊस, नवीन चित्रनगरी, अनुदान वाढीसह सुसज्ज सोयी-सुविधांचे जाहीरनाम्यात आश्वासन

सुरक्षा रक्षकांच्या भरतीसंदर्भातील प्रस्ताव पाठविण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने तातडीने प्रस्ताव तयार करून आयुक्तांच्या कार्यालयात पाठविल्याची माहिती डॉ. जयराज आचार्य यांनी दिली.