मुंबई : राज्यात हळूहळू करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने सक्रिय रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. राज्यात मंगळवारी ३७ नवे रुग्ण आढळले असून, यामध्ये मुंबईमध्ये १९ रुग्णांचा समवेश आहे. त्याचप्रमाणे राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या १६८ वरून १९४ इतकी झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यातील रुग्णांची संख्या ८१ लाख ७२ हजार २०० इतकी झाली आहे. राज्यात मागील काही दिवसांपासून करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. राज्यात सोमवारी २८ नवे रुग्ण सापडले असताना मंगळवारी त्यात वाढ होऊन ३७ नवे रुग्ण सापडले. यामध्ये मुंबईमध्ये सर्वाधिक १९, पुणे ६, हिंगोली ३, रायगड व नवी मुंबईमध्ये प्रत्येकी २, ठाणे मनपा, जळगाव, कोल्हापूर मनपा, नांदेड, नागपूर मनपामध्ये प्रत्येकी एक करोनाचा रुग्ण सापडला आहे. त्यामुळे राज्यातील करोना रुग्णांची संख्या ८१ लाख ७२ हजार २०० इतकी झाली आहे.

हेही वाचा – पाणी पुरवठ्यासाठी जलबोगद्यातून समांतर यंत्रणा उभारणार; पाणी गळतीच्या वेळी पाणी पुरवठा ठप्प होऊ नये म्हणून उपाययोजना

राज्यामध्ये सक्रिय रुग्णांमध्येही वाढ झाली आहे. राज्यामध्ये मंगळवारी सक्रिय रुग्णांची संख्या १९४ इतकी झाली आहे. यामध्ये मुंबईमध्ये ८८, ठाणे ३०, पुणे २८, रायगड १९, सांगली ८, कोल्हापूर ४, छत्रपती संभाजी नगर, बीड, हिंगाेली प्रत्येकी ३, सातारा, नागपूर प्रत्येकी २, सिंधुदुर्ग, जळगाव, नांदेड व अमरावतीमध्ये प्रत्येकी १ रुग्ण सक्रिय आहे.

हेही वाचा – ठाणे स्थानकात प्रवाशांना घेराव घालून तिकीट तपासणी

राज्यात मंगळवारी ११ रुग्ण बरे झाल्याने बरे झालेल्या रुग्णांची संख्या ८० लाख २३ हजार ४४२ इतकी आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१८ टक्के इतके आहे. राज्यातील मृत्यूदर १.८१ टक्के एवढा आहे. राज्यात जेएन.१ चे १० रुग्ण असून, एक्सबीबी.१.१६ चे १९७२ रुग्ण सापडले आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Increase in the number of corona patients 37 new patients of corona in maharashtra mumbai print news ssb