मुंबई : कोट्यवधी रुपये खर्चून पर्जन्य जलवाहिन्यांची कामे केली असली तरी गेल्यावर्षीच्या पावसाळ्याच्या तुलनेत यंदाही मुंबईतील पाणी भरण्याची ठिकाणे वाढल्याचे आढळून आले आहे. येत्या पावसाळ्यात पाणी उपसा करण्यासाठी तब्बल ४८१ उदंचन संच (पंप) मुंबई महापालिका भाड्याने घेणार आहे. दोन वर्षांसाठी उदंचन संचाची सेवा देण्याकरीता पालिका यंदा १२६ कोटी रुपये खर्च करणार आहे. गेल्यावर्षी पालिकेने ३८० संच बसवले होते व त्याकरीता दोन वर्षासाठी ९२ कोटी खर्च केले होते. त्यामुळे यंदा पंपांची संख्या व पंपाच्या खर्चातही वाढ झाली आहे.

मुंबईच्या भौगोलिक रचनेमुळे सखल भागात दरवर्षी पावसाचे पाणी जमा होते व त्याचा निचरा होत नाही. मुंबईला चारही बाजूने समुद्राने वेढलेले असून मुंबईत पावसाचे प्रमाणही मोठे आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाणी तुंबण्याचा धोका मुंबईला असतो. या कारणास्तव पालिका प्रशासनाने ब्रिमस्ट्रोवॅड प्रकल्पांतर्गत कोट्यवधी रुपयांची कामे केली आहेत. मात्र तरीही दरवर्षी मुंबईत पाणी साचतेच. पर्जन्यजलवाहिन्यांची सुधारणा करून त्यांची क्षमता वाढवल्यानंतरही अनेक ठिकाणी उदंचन संच अर्थात पंप लावून पाणी उपसावे लागते. गेल्या कित्येक वर्षांपासून पावसाच्या पाण्याचा उपसा करण्यासाठी अशा पद्धतीने उदंचन संचाची व्यवस्था करावी लागते आहे. मात्र तरीही उदंचन संचाची संख्या आणि पाणी भरण्याची ठिकाणे कमी झालेली नाहीत. मुंबईतील सर्व २४ विभागांत सखल भागात आणि रुग्णालयात हे संच ठेवले जातात.

Reliance Industries Q3 results,
रिलायन्स इंडस्ट्रीजचा तिमाही नफा वाढून १८,५४० कोटींवर; शेअरच्या भाव वाढेल काय, विश्लेषकांचे अंदाज काय?  
Mahakumbh 2025 Mamta Kulkarni Kinnar Akhada
Mahakumbh 2025: इंजिनीअर्स, डॉक्टर्स व तरुणांना किन्नर आखाड्याचे आकर्षण का?
Nitrate-rich groundwater in Wardha district
धक्कादायक! वर्धा जिल्ह्यातील भूगर्भात नायट्रेटयुक्त पाणी, कर्करोगासह विविध आजार…
unseasonal rain, Vidarbha, temperature, rain ,
विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता! किमान तापमानात वाढ
Ulhasnagar Water Supply, Women Movement ,
ठाणे : “पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत मागे हटणार नाही”, संतप्त नागरिकांचा पाणीपुरवठा कार्यालयात ठिय्या
Garbage collection, pune , Garbage collection night ,
पुणे शहरात आता रात्रीही होणार कचरासंकलन, हे आहे कारण ?
Ghodbunder residents questions to thane municipal officials regarding water tanker and water issues
आम्हाला देण्यासाठी पाणी नाही मग, टँकरचालकांना कसे मिळते; घोडबंदरवासियांनी विचारला पालिका अधिकाऱ्यांना सवाल
Thane Municipal Corporation prepares water supply plan for next 30 years amid urbanization
अवाढव्य वाढलेल्या ठाण्याची तहान वाढीव पाणी पुरवठा भागवेल का?

आणखी वाचा-शेतकरी पुत्राचे पहिल्याच प्रयत्नात ‘यूपीएससी’ परीक्षेत यश, हिंगोलीतील डॉ. अंकेत जाधव ‘यूपीएससी’ परीक्षेत देशात ३९५ वा

जलमय सखलभागांच्या संख्येत वाढ?

पालिकेने दोन वर्षांसाठी उदंचन संचाची सेवा भाड्याने घेण्याचे ठरवले आहे. त्याकरीता विभाग कार्यालयांकडून प्रस्ताव मागवले होते. त्यानुसार विभाग कार्यालयांनी आपली मागणी कळवली असून यंदा तब्बल ४८१ पंप भाड्याने घेतले जाणार आहेत. याकरीता निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच कार्यादेश दिले जाणार आहे. शहर भागात १८७, पश्चिम उपनगरांमध्ये १६६ आणि पूर्व उपनगरांमध्ये १२४ पंप बसविण्यात येणार आहेत.

पंपांची संख्या वाढण्यामागे विविध कारणे असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अनेक विभाग हे खबरदारीचा उपाय म्हणून अतिरिक्त पंप मागवतात. तर कधी लोकप्रतिनिधींनी मागणी केली म्हणूनही पंप बसवले जातात. पावसाळ्यातील परिस्थितीनुसार पाणी साचण्याच्या ठिकाणांमध्ये वाढही होऊ शकते, या दृष्टीने हे पंप बसवले जात असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

आणखी वाचा-मुंबई: हेल्मेटशिवाय दुचाकीवरून तिघांची सफर जीवावर बेतली; दोघांचा मृत्यू, दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा

सुमारे शंभर ठिकाणे वाढली

सन २०२२ व २०२३ मध्ये ३८० पंप बसविण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र, विभागांच्या मागणीनुसार ५५ अतिरिक्त म्हणजेच एकूण ४३५ पंप बसविण्यात आले होते. तर, सन २०२३ मध्ये वाढीव मागणीनंतर ११२ अतिरिक्त पंपांसह एकूण ४९२ पंप कार्यान्वित होते. तर यंदा म्हणजेच सन २०२४ मध्ये २५ प्रशासकीय विभाग आणि राजे एडवर्ड स्मारक (केईएम) रुग्णालय, लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रूग्णालाच्या मागणीनुसार विविध ठिकाणांवर ४८१ पंप बसविण्यात येणार आहेत.

वर्ष पंप नियोजनअतिरिक्त संचाची सोय
२०२०२९२ अतिरिक्त ८६ संच
२०२१ २९२अतिरिक्त १३४ संच
२०२२३८० अतिरिक्त ५५ संच
२०२३३८०अतिरिक्त ११२ संच
२०२४४८१

यावर्षी कुठे किती पंप

सर्वाधिक पंप कुर्ला, मालाड, वांद्रे, सांताक्रूझ पूर्व मध्ये बसवण्यात येणार आहेत.

कुर्ला (एल) – ५१

मालाड (पी उत्तर) – ४५

वांद्रे, सांताक्रूझ पूर्व (एच पूर्व) – ३५

कुलाबा, चर्चगेट (ए) – ३०

वडाळा, नायगाव (एफ उत्तर) – २४

Story img Loader