मुंबई: मुंबईतील चित्रपटगृहे, नाट्यगृहे, सर्कस, आनंदबाजार यांचे प्रयोग व खेळ यांच्यावरील रंगभूमी करात वाढ करण्याचे पालिका प्रशासनाने ठरवले आहे. गेल्या १३ वर्षांत ही करवाढ करण्यात आली नव्हती. २०२४-२५ या वर्षासाठीच हे नवीन कर प्रस्तावित करण्यात आले असून राज्य सरकारने मंजुरी दिल्यावर हे कर लागू होतील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चित्रपट, नाटक, सर्कस, आनंदबाजार यांचे प्रयोग व खेळ यांच्यावर रंगभूमी कर आकारण्याचे अधिकार मुंबई महापालिकेला आहेत. मराठी व गुजराती नाटके, चित्रपट, एकपात्री नाट्यप्रयोग, तमाशा यांना या रंगभूमीकराच्या अधिदानातून माफीची सवलत असते. २०१० मधील दरानुसार सध्या हे कर आकारले जात आहेत. त्यामुळे प्रत्येक खेळामागे ५० ते ६० रुपये आकारले जात आहेत. या कराच्या दरात दरवर्षी १० टक्के वाढ करावी, असा प्रस्ताव महासभेत २०१५ मध्ये मंजूर झाला होता. मात्र त्याला राज्य सरकारने अद्याप मंजुरी दिली नसल्यामुळे जुनेच दर आकारले जात आहे. मात्र त्यात आता वाढ करण्याचा निर्णय करनिर्धारण व संकलक विभागाने घेतला आहे. ही करवाढ लागू झाल्यास पालिकेला वार्षिक १० कोटींचा महसूल मिळणार आहे. या दरवाढीचा प्रस्ताव प्रशासनाने राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला आहे.

हेही वाचा… वैतरणा जलवाहिनी दुरूस्तीच्या कामासाठी गुरुवारी कुर्ला, भांडुपमध्ये पाणीपुरवठा बंद; शहर भागात १० टक्के पाणी कपात

आतापर्यंत वातानुकूलित चित्रपटगृहांसाठी सरसकट प्रत्येत खेळासाठी ६० रुपये कर आकारला जातो. मात्र गेल्या काही वर्षांत उदयास आलेल्या ‘मल्टीप्लेक्स’ चित्रपटगृहांमध्ये एकाच इमारतीत १ ते ८ पडदे असतात. त्यांची आसन क्षमता ५० ते २५० इतकी असून तिकीट दर २०० ते १५५० च्या दरम्यान असते. त्यामुळे या मल्टीप्लेक्सवरील करमणूक करांत वाढ करण्याचे पालिकेने ठरवले आहे.

नवे व जुने दर असे

प्रकारसध्याचा करप्रस्तावित कर
मल्टीप्लेक्स६० (रु.)४०० (रु.)
वातानुकूलित सिनेमागृह६६ (रु.)२०० (रु.)
वातानुकूलित नसलेली सिनेमागृह५० (रु.)९० (रु.)
नाटक,जलसा,करमणुकीचे इतर कार्यक्रम२८ (रु.)१०० (रु.)
सर्कस, आनंदमेळा प्रतिदिन५५ (रु.)१०० (रु.)
इतर करमणूक कार्यक्रमांसाठी३० (रु.)७० (रु.)
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Increase in theater tax for cinemas theaters in mumbai implementation after approval of state govt mumbai print news dvr