मुंबई : एकीकडे राज्यात करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढल्यानंतर लसीकरणात सुमारे ६६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. परंतु दुसरीकडे १८ वर्षांवरील १ कोटी ७२ लाख नागरिकांनी मात्र अद्याप दुसरी मात्रा घेतलेली नाही. राज्यात दोन्ही मात्रा पूर्ण केलेल्यांचे प्रमाण सुमारे ७७ टक्के आहे. राज्यात तिसरी लाट ओसरल्यानंतर लसीकरणाचा जोरही कमी झाला. जानेवारीमध्ये राज्यात दैनंदिन सरासरी सुमारे ४ लाख ६९ नागरिक लस घेत होते. फेब्रुवारीमध्ये जवळपास निम्म्याने घट होऊन हे प्रमाण सुमारे २ लाख ६८ हजारांवर आले. यानंतर मे महिन्यापर्यंत ही घट उत्तरोत्तर वाढतच गेली असून मे महिन्यात दैनंदिन सरासरी लसीकरणाचे प्रमाण सुमारे ६० हजारांपर्यत खाली आले आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात करोनाबाधितांचा आलेख वेगाने वाढायला लागला. परिणामी, जूनच्या पहिल्या आठवडय़ातच लसीकरणाने पुन्हा वेग घेतल्याने जून महिन्यात दैनंदिन लसीकरणाचे प्रमाण जवळपास पुन्हा १ लाखाच्यावर गेले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

लसीकरणाचे प्रमाण वाढले असले तरी १८ वर्षांवरील नागरिकांनी दुसऱ्या मात्रेकडे मात्र पाठ फिरवली आहे. राज्यात पहिली मात्रा घेणाऱ्यांचे प्रमाण ९२ टक्क्यांवर गेले असले तरी सुमारे १ कोटी ७२ हजार नागरिकांनी दुसरी मात्रा पूर्ण केलेली नाही. यामध्ये कोविशिल्डधारकांचे प्रमाण १ लाख ४० हजार तर कोव्हॅक्सिनधारकांचे सुमारे ३२ लाख ४६ हजार इतके आहे. यामध्ये सर्वाधिक सुमारे १६ लाख नागरिक पुण्यातील आहेत. त्या खालोखाल मुंबईतील सुमारे १० लाख ७३ हजार तर ठाण्यातील सुमारे १० लाख ६५ हजार नागरिकांचा समावेश आहे.

वर्धक मात्रेलाही कमी प्रतिसाद

राज्यात ६० वर्षांवरील नागरिकांसाठी वर्धक मात्रा जानेवारीमध्ये सुरू केली असली तरी याला अजूनही फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. दोन्ही मात्रा पूर्ण केलेल्या ज्येष्ठांची संख्या सुमारे १ कोटी १३ लाख आहे. परंतु यातील सुमारे १५ टक्के नागरिकांनीच वर्धक मात्रा घेतली आहे. १८ वर्षांवरील नागरिकांसाठी वर्धक मात्रा सुरू केली असली तरी ही मात्रा सशुल्क आहे. या वयोगटातील नागरिकांचाही वर्धक मात्रेला अल्प प्रतिसाद मिळाला असून या वयोगटातील केवळ ०.५३ टक्के नागरिकांनी वर्धक मात्रा घेतली आहे.

सद्य:स्थिती..

राज्यात दुसऱ्या मात्रेचे लसीकरण सर्वाधिक मुंबईत (१०१ टक्के) झाले आहे. त्या खालोखाल पुणे, रायगड, भंडारा या जिल्ह्यांचा समावेश आहे. नंदुरबारमध्ये सर्वात कमी ( ५१ टक्के) दुसऱ्या मात्रेचे लसीकरम्ण झाले आहे. यानंतर अकोला, बुलढाणा आणि बीड या जिल्ह्यांमध्ये ६० टक्क्यांपेक्षाही कमी नागरिकांनी दुसरी मात्रा पूर्ण केली आहे.

मुंबईत १,७४५ नवे रुग्ण, एकाचा मृत्यू

मुंबई : शनिवारी मुंबईत करोनाचे १,७४५ नवे रुग्ण आढळले, तर एका रुग्णाचा मृत्यू झाला. बाधितांपैकी १,६४६ रुग्णांना लक्षणे नाहीत, तर ९९ जण रुग्णालयात दाखल झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के आहे. प्राणवायू खाटांवर ११ रुग्ण आहेत. ठाणे जिल्ह्यात ५४३ शनिवारी नवे रुग्ण आढळले.