लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई : देशांतर्गत भांडवली बाजारात प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीची उच्चांकी घोडदौड कायम असून सेन्सेक्स ८५,००० अंश पातळीच्या नजीक पोहोचला आहे. ग्राहकोपयोगी वस्तू, वाहन निर्मिती आणि सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये झालेल्या चौफेर खरेदीने प्रमुख निर्देशांक उच्चांकी शिखरावर स्थिरावले. या जोडीला परदेशी संस्थात्मक गुंतवणूदारांकडून बाजाराकडे अखंड निधी ओघ सुरू आहे.

Shani will create Shash Raj
धनत्रयोदशीच्या शुभ मुहर्तावर तब्बल ३० वर्षानंतर शनी निर्माण करणार शश राजयोग; ‘या’ ३ राशींच्या व्यक्तींचे चमकणार भाग्य, मिळणार धनसंपत्तीचे सुख
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
La Nina, The rainy season, climate patterns, global phenomenon
विश्लेषण : ‘ला निना’चा पावसाळी मुहूर्त चुकला! आता कडाक्याच्या थंडीबरोबर गारपिटीचीही शक्यता?
Vasu Baras 2024
Vasu Baras 2024:धेनुगळ म्हणजे काय?
Mumbai minimum temperature drops, Mumbai temperature, Mumbai latest news,
मुंबईच्या किमान तापमानात घट
stock market today sensex drops 663 point nifty ends below 24200
परकीयांच्या विक्रीने बाजार बेजार ! करोनानंतरचा सर्वात घातक महिना
sensex fell two month low with 930 points nifty close below 24500
सेन्सेक्स ९३० अंशांच्या गटांगळीसह दोन महिन्यांच्या नीचांकी
imd predicted temperature will remain high in mumbai for the next two days
उकाडा, घामाच्या धारांनी मुंबईकर हैराण; दिवसा ऊन, संध्याकाळच्या पावसामुळे आर्द्रतेतही वाढ

सलग तिसऱ्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स सकारात्मक राहिला असून तो ८५,००० अंशांच्या वेशीवर पोहोचला आहे. सेन्सेक्स ३८४.३० अंशांची उसळी घेत ८४,९२८.६१ या सर्वोच्च उच्चांकावर स्थिरावला. दिवसभरात, त्याने ४३६.२२ अंशांची मजल मारत ८४,९८०.५३ च्या ऐतिहासिक शिखराला स्पर्श केला होता. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १४८.१० अंशांची वाढ झाली आणि तो २५,९३९.०५ या विक्रमी शिखरावर बंद झाला. तो देखील २६,००० या ऐतिहासिक पातळीपासून अवघे ६१ अंश दूर आहे. त्याने सत्रात १६५.०५ अंशांची कमाई करत २५,९५६ च्या नवीन सर्वोच्च शिखर गाठले होते.

हेही वाचा – अंध दाम्पत्याचे बाळ परस्पर दत्तक ! प्रसूतीनंतर अंध महिलेला स्तनपान बंद करण्याच्या दिल्या गोळ्या

अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हच्या दर कपातीने जगभरातील भांडवली बाजारांमध्ये नव्यने उत्साह भरला आहे. निर्मिती आणि सेवा क्षेत्रातील ‘पीएमआय’ आकडेवारी कमकुवत राहिली असली तरी देशांतर्गत आघाडीवर नियंत्रणात असलेला महागाई दर आणि जागतिक बँकांनी केलेल्या व्याजदर कपातीमुळे रिझर्व्ह बँकेच्या भूमिकेत देखील बदल होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे, असे मत जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा – डोंबिवलीतील शिंदे गटातील युवा नेत्याला इशारा, बंडखोरांकडे दुर्लक्ष करून महायुतीचे काम जोमाने करा, श्रीकांत शिंदे यांचा सल्ला

सेन्सेक्समधील आघाडीच्या ३० कंपन्यांपैकी महिंद्र अँड महिंद्र, स्टेट बँक, भारती एअरटेल, हिंदुस्तान युनिलिव्हर, कोटक महिंद्र बँक, अल्ट्राटेक सिमेंट, अदानी पोर्ट्स आणि टाटा स्टीलचे समभाग सर्वाधिक वधारले. तर आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक, एशियन पेंट्स, टेक महिंद्र, इन्फोसिस, एचसीएल टेक्नॉलॉजीज, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि लार्सन अँड टुब्रोच्या समभागात मात्र घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (एफआयआय) शुक्रवारी १४,०६४.०५ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची खरेदी केली.

सेन्सेक्स ८४,९२८.६१ + ३८४.३०
निफ्टी २५,९३९.०५ +१४८.१०
डॉलर ८३.५५ +१ पैसा
तेल ७४.५५ +०.०९