देशभर आज (सोमवार) धुळवड उत्साहात साजरी करण्यात येत आहे. सामान्य जनतेसोबतच राजकीय नेते आणि चित्रपट कलाकारही धुळवडीत न्हाऊन निघाल्याचे चित्र दिसत आहे. राज्यामध्ये धुळवडीचा जल्लोष फार कमी पहायला मिळत आहे. नुकत्याच झालेल्या गारपिटीमुळे ग्रामिण महाराष्टर धुळवड साजरी करण्याच्या मनस्थितीत नाही. शहरातही पाण्याचा कमी वापर केलेला पहायला मिळत आहे. अनेकांनी फक्त रंगांनीच धुळवड खेळणे पसंत केले.
भाजपचे राष्ट्रीय़ अध्यक्ष राजनाथ सिंग, यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही कार्यकर्त्यांना रंग लावून राजकीय धुळवड साजरी केली. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आगामी लोकसभा निवडणूक उत्तरप्रदेशातील वाराणसी मतदारसंघातून लढवणार असल्याची घोषणा भाजपकडून करण्यात आली आहे, त्यामुळे येथे आज भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात धुळवड साजरी केली.
मराठी कलाकारांनी एकत्र येऊन धुळवड साजरी करण्याचे हे नववे वर्ष असून यानिमित्ताने एक निधी जमा करून तो राज्यातील गारपिटग्रस्त शेतक-यांना मदत म्हणून देण्याचा त्यांचा मानस असल्याचेही कलाकार प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले.
दरवर्षीप्रमाणे अनेक परदेशी पर्यटकही भारतात दाखल झाले असून, उत्तर भारतात ते या सणाचा आनंद घेताना दिसत आहेत. देशात या सणाला कोणतेही गालबोट लागू नये म्हणून राज्यांतील पोलिसांतर्फे चोख सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा