अंडरवर्ल्ड डॉन व १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या साखळी स्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिम याला पकडण्यासाठी अमेरिकेच्या मदतीने दाऊदला अटक करणार असल्याचे, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले.
सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, दाऊद पाकिस्तानातच आहे. त्याला पकडण्यासाठी अमेरिका आणि एफबीआयसोबत बोलणे झाले आहे. तसेच, अमेरिकेचे अॅटर्नी जनरल यांच्यासोबत माझी चर्चा झाली असून, त्यांनी सहकार्य करण्याचेही आश्वासन दिले आहे. तसेच, दाऊद हा आंतरराष्ट्रीय दहशतवादी असल्यामुळे दोन्हीही देशांचे एकमेकांना सहकार्य आवश्यक आहे. भारतीय गुप्तहेर यंत्रणांच्या मदतीने पोलिसांनी नुकतेच अब्दुल करीम टुंडा, यासिन भटकळ या दहशतवाद्यांना अटक केलेली आहे. यांना अटक केल्यानंतर दाऊदलाही लवकरच ताब्यात घेण्यात येईल, असेही ते म्हणाले.
अल-कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याने अमेरिकेने २००३ मध्ये दाऊद इब्राहिमचा मोस्ट वाँन्टेड दहशतवाद्यांच्या यादीत समावेश केला होता.

Story img Loader