महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मुंबईतील पहिल्यावहिल्या टेस्ट ट्यूब बेबीने जसलोक रुग्णालयात तिच्या मुलाला जन्म दिला. ६ ऑगस्ट १९८६ रोजी आयव्हीएफ पद्धतीने हर्षा चावडा हिचा जन्म झाला होता. त्यावेळी हर्षा देशातील दुसरी आणि मुंबईतील पहिली टेस्ट ट्यूब बेबी ठरली होती. हर्षाने काल सकाळी साडेदहाच्या सुमारास मुलाला जन्म दिला. विशेष म्हणजे हर्षाच्या आईची प्रसुती करणाऱ्या डॉ. इंदिरा हिंदुजा यांनीच ३० वर्षानंतर तिची प्रसूती केली.
रविवारी सायंकाळी हर्षाला जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर सोमवारी सकाळी तिने बाळाला जन्म झाला. सिझेरियन पद्धतीने ही प्रसूती झाली. आई आणि मुलगा दोघेही सुखरूप आहेत. बाळाचे वजन ३ किलो १८ ग्रॅम आहे. ३० वर्षांपूर्वी हर्षदाची आई मणी चावडा यांना क्षयरोग झाला होता. त्यामुळे त्यांच्या फेलोपिन ट्युब्ज कायमच्या निकामी झाल्या होत्या. त्यावेळी केईएम रुग्णालयात डॉ. हिंदुजा यांनी त्यांना नवीन टेस्ट ट्यूब बेबीच्या तंत्रज्ञानाविषयी सांगितले होते. त्यांनीही त्याला लगेच तयारी दर्शवली होती. त्यानंतर डॉ. हिंदुजा यांनी या तंत्रज्ञानाचा वापर केला. त्याला यशही आले. हर्षाचा जन्म ही त्यावेळची मोठी घटना ठरली होती. मुंबईतील पहिली टेस्ट ट्यूब म्हणून तिला भरपूर प्रसिद्धी मिळाली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा