हायब्रीड पद्धतीच्या सायकलीवरून त्या दोघांनी ६ फेब्रुवारीला रोजी दिल्लीच्या इंडिया गेटवरून सायकल चालवायला सुरुवात केली आणि काल (शनिवार) सकाळी दहा वाजता मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया येथे  पोहोचले तेव्हा चेह-यावर होते ते समाधान आणि पोलिसदलाला दिलेल्या मानवंदनेबद्दल अभिमान. भारतीय पोलिसदलाला १५० वष्रे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने नाशिकच्या हरीश बजल आणि हर्षद पुरणपात्रे यांनी हे आव्हान स्विकारले होते. जवळपास १५०० किलोमीटरचा लांबीचा रस्ता अवघ्या १० दिवसांमध्ये त्यांनी पार केला. दिल्ली-हरयाणा-राजस्थान-गुजरात आणि महाराष्ट्र अशा पाच राज्यांमधून सायकलींग केल्यानंतर भारतही वेगळ्या नजरेने पाहता आला, असं बजल ‘लोकसत्ता’शी बोलताना म्हणाले. सध्या नाशिक पोलिस ट्रेनिंग अकॅडमी उच्चपदावर असलेल्या हरीश बजल यांनी एप्रिल २०१२ मध्ये सायकलींगला सुरुवात केली. पण बजल यांना काहीतरी ऑफ-बीट करायचं होतं. मग त्यांना निमित्त सापडलं ते भारतीय पोलिसदलाला १५० वर्ष पूर्ण झाल्याचं. त्यांनी या दोघांची सांगड घालायची ठरवलं आणि त्याची आखणी सुरू झाली. लागलीच त्यांना नाशिकचे हर्षद हे पार्टनर म्हणून मिळाले. दिल्ली – जयपूर – अजमेर -उदयपूर – हिम्मतनगर – अहमदाबाद-बडोदा – सुरत – मुंबई या १५०० किलोमीटर लांबींच्या प्रवासासाठी ६ फेब्रुवारी दिल्लीतून फ्लॅग ऑफ करण्यात आला. दिल्लीहून येताना प्रथम आग्रा माग्रे येण्याचा विचार होता. मात्र, दिल्ली आग्रा एक्स्प्रेस-वेवर सायकलीस्टला प्रवेश नसल्याने त्यांना जयपूर माग्रे यावे लागले. उत्तरेची गोठवणारी थंडी आणि गुजरातच्या दिशेने पुढे सरकायला लागल्यावर डोक्यावर तळपणारा सूर्य अशा दोन विरुध्द हवामानात सायकल चालवणे हे आव्हान होते, असं बजल म्हणाले. या रस्त्यावर फार फार चढ-उतार नाही, तरीही दरदिवशी १४० ते १६० किलोमीटरचा प्रवास त्यांनी सहज पार केला. या राईडच्या सरावाकरता नाशिक – ित्रबकेश्वर – नाशिक या रस्त्यावर आठवड्यातून चार दिवस ते सराव करत होते.
इंग्रजांनी १८६३ मध्ये भारतात पोलिसदलाची स्थापना केली होती. त्या गोष्टीला यावर्षी १५० वष्रे पूर्ण होत आहेत. पोलिसदलाच्या आजवरच्या वाटचालीला मानवंदना देण्यासाठी म्हणून हे आव्हान बजल यांनी स्विकारले होते. तसेच भारतात सायकलींगला कसे प्रोत्साहन देता येऊ शकते हा उद्देशही त्यामागे होता. यामध्ये कुठल्याही विशिष्ट राज्यातील नव्हे तर  संपूर्ण भारतीय पोलिसदल असल्यामुळे  इतर राज्यांच्या पोलिस खात्यांकडूनही चांगली वागणूक मिळाली. त्यांच्या या धाडसाचे सर्वच राज्यातील पोलिसांनी कौतुक केले आणि मोठ्या प्रेमाने ठिकठिकाणी त्यांचे आदरातिथ्य केले. एवढंच नव्हे तर वाटेत अनेक ढाबेवाल्यांनीही त्यांच्याकडून जेवणाचे पसेच घेतले नाहीत.
भारतात सायकलींगसाठी पूरक वातावरण आणि निसर्ग आहे, त्यामुळे  सरकारने यासाठी विशेष मेहनत घ्यायला हवी असं बजल यांना वाटतं.
बजल यांची व्हिडिओ मुलाखत पाहण्यासाठी भेट द्या
http://www.youtube. com/LoksattaLive

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा