‘इंडियाबुल्स पॉवर लि.’तर्फे अमरावतीमध्ये उभारण्यात आलेल्या १३५० मेगावॉट क्षमतेच्या वीजप्रकल्पातील पहिला २७० मेगावॉट क्षमतेचा संच सुरू झाला असून तो ग्रीडशी जोडला गेला आहे. लवकरच या संचातून पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती सुरू होईल. ती सर्व राज्याला मिळणार आहे.
‘इंडियाबुल्स पॉवर लि.’तर्फे अमरावतीमधील नांदगावपेठ येथे २७०० मेगावॉटचा वीजप्रकल्प उभारण्यात येत आहे. त्यातील पहिला टप्पा १३५० मेगावॉटचा आहे. त्यातील १२०० मेगावॉट वीज महाराष्ट्राला मिळणार आहे. त्यासाठी ‘महावितरण’सह वीजखरेदी करारही झालेला आहे. प्रति युनिट तीन रुपये २६ पैसे या दराने ही वीज मिळणार आहे.
पहिल्या टप्प्यातील १३५० मेगावॉटच्या प्रकल्पातील पहिला २७० मेगावॉटचा संच आता सुरू झाला आहे. ग्रीडशी तो जोडला गेला असून येत्या काही दिवसांत त्यातून पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती सुरू होईल. त्यानंतर दर दोन महिन्यांनी एक २७० मेगावॉटचा संच अशारितीने बाकीचे संच कार्यान्वित होतील, असे ‘इंडिया बुल्स’तर्फे सांगण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा