शनिवार आणि रविवार असे दोन दिवस मुंबईतील मरीन ड्राईव्हचा परिसर हा हवाई दलातील विमाने आणि हेलिकॉप्टर यांच्या आवाजाने दणाणून जाणार आहे. नागरीकांमध्ये सरंक्षण दलाबद्दलची रुची वाढावी, अधिकाधिक लोकं संरक्षण दलाच्या सेवेत दाखव व्हावी या उद्देशाने दोन दिवसांच्या चित्तथरारक हवाई कसरतींचे आयोजन भारतीय वायू दलाने केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय वायू दलातील हवाई कसरती करणारी हेलिकॉप्टरची ‘सारंग’ टीम आणि विमानांची ‘सूर्य किरण’ टीम प्रात्यक्षिके सादर करणार आहेत. यासाठी मुंबईतील प्रसिद्ध ‘क्वीन्स नेकलेस’ म्हणजेच मरीन ड्राईव्ह हा परिसर निवडण्यात आलेला आहे.

‘सारंग’ हेलिकॉप्टर हे जगामध्ये हवाई कसरतींसाठी प्रसिद्ध आहे. ही हेलिकॉप्टर भारतीय बनावटीची Dhruv हेलिकॉप्टर असून हवेत सूर मारणे, विविध रंग उधळत वेगाने कसरती करण्याची या ‘सारंग’ हेलिकॉप्टर टीमची क्षमता आहे. मुंबईतील हवाई कसरतीमध्ये चार हेलिकॉप्टर सहभागी होणार आहेत. तर ‘सूर्य किरण’ही ब्रिटनचे तंत्रज्ञान असलेली आणि खास करुन वैमानिकांना प्रशिक्षण देण्यासाठी वापरली जाणारी Hawk जातीची विमाने आहेत. १९९६ पासून ‘सूर्य किरण’ ने जगभारत हवाई कसरती करत वाहवा मिळवली आहे.

एवढंच नाही तर भारतीय वायू दलाचं ब्रह्मास्र म्हणून ओळख असलेले Su-30 MKI हे लढाऊ विमान तर सर्व प्रकारच्या वातावरणात वापरले जाणारे, बहुउद्देशीय असं मालवाहू विमान C-130 हे या हवाई कसरती दरम्यान सलामी देऊन जाणार आहे. तर वायू दलाची Sky diving टीम – छत्रधारी सैनिक ( Parachute soldiers )हे काही हजार फुटांवरुन जमिनीवर उतरतांना कसरती सादर करणार आहेत.

तर पुढील दोन दिवस दुपारी १२ ते एकच्या दरम्यान भारतीय वायू दलाच्या हवाई कसरती बघता येणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian air force aerial display show at marine drive mumbai sarang helicopter and surya kiran aircraft participate asj