इंडियन एक्स्प्रेस वृत्तसमूहाच्या कम्पोझिंग विभागातील ‘सीनियर व्हीडीटी ऑपरेटर’ नंदकुमार वसंत राक्षे यांचे काल शनिवारी मध्यरात्री  हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मिक निधन झाले. निधनसमयी ते ५२ वर्षांचे होते.गेली २५ वर्षे ते ‘इंडियन एक्स्प्रेस’ वृत्तसमूहात कार्यरत होते. त्यांच्या मनमिळाऊ, हरहुन्नरी स्वभावामुळे व सर्वाना मदत करण्याच्या वृत्तीमुळे मित्रपरिवार व स्थानिक रहिवाशांमध्ये ते  लोकप्रिय होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुली व मुलगा असा परिवार आहे. राक्षे यांच्या अन्त्ययात्रेस इंडियन एक्स्प्रेस न्यूजपेपर्स एम्प्लॉइज युनियनचे पदाधिकारी, कर्मचारी, तसेच मित्रपरिवार व आप्तस्वकीय मोठय़ा संख्येने उपस्थित होते. त्यांच्या अकस्मात निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.   

Story img Loader