पुणे : दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या पहिल्या खो-खो वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय पुरुष आणि महिला संघाने दैदिप्यमान कामगिरी करत विजेतेपद पटकावले.या विजयी संघातील खेळाडूंचे पुण्यात आगमन झाल्यानंतर जोरदार स्वागत करण्यात आले.यावेळी खेळाडूंच्या हस्ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती करत विजयी रॅली काढण्यात आली.यावेळी आमदार हेमंत रासने यांनी पुरुष संघाचा कर्णधार प्रतीक वाईकर, खेळाडू सुयश गरगटे, आदित्य गणपुले, पुरुष संघाचे प्रशिक्षक शिरीन गोडबोले, महिला संघाच्या प्रशिक्षिका प्राची वाईकर यांचा सत्कार करित अभिनंदन केले.यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर येथून विजयी रॅलीची सुरुवात झाल्यानंतर सदाशिव पेठेतील चिमण्या गणपती चौक येथे रॅलीचा समारोप करण्यात आला.

यावेळी कर्णधार प्रतीक वाईकर म्हणाला की, “कर्णधार म्हणून दडपण नव्हतं, पण देशवासीयांच्या अपेक्षांची जबाबदारी होती. वर्ल्ड कप आपल्याच देशात असल्याने जिंकायचं होतं, आणि फायनलमध्ये मोठ्या फरकाने विजय मिळवल्याचा आनंद आहे. बर्मिंगहॅममध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी आम्ही तयार आहोत. खो-खो ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट करण्यासाठी सरकार प्रयत्न करत असून शाळांमध्ये आणि अकादमींमध्ये या खेळाचे प्रशिक्षण महत्त्वाचे असल्याचे त्याने सांगितले.

Accident
Accident : बोगद्यात अपघात, BMW चा चक्काचूर, मदतीसाठी अर्धा तास याचना, पण…; भयंकर अपघातातून वाचलेल्या महिलेचा थरारक अनुभव
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Bike went viral on social media due to quotes written in the back funny quote goes viral
“बायकोने सांगितलंय…”, पठ्ठ्याने बाइकच्या मागे लिहिलं ‘असं’ काही की, वाचून पोट धरून हसाल
ats arrested accused for forging Aadhaar and pan cards for Bangladeshi infiltrators
बांगलादेशी घुसखोरांना आधारकार्ड, पॅनकार्ड बनवून देणाऱ्यांना एटीएसकडून अटक, तीन बांगलादेशी नागरिकांसह सात जणांना अटक
Former MP Kisanrao Bankheles son commits suicide
माजी खासदार किसनराव बाणखेले यांच्या मुलाची आत्महत्या
Two Bangladeshis arrested from pimpri
पिंपरी : दोन बांगलादेशींना अटक; आत्तापर्यंत किती घुसखोर बांगलादेशींवर कारवाई?
Give Land Back to the Sea
समुद्राला जमिनीचे दान…! पूरनियंत्रणासाठी इंग्लंडमधील अभिनव प्रयोग काय होता? तो कितपत यशस्वी ठरला?
Clashes between BJP MLAs and marshals in the Assembly in Jammu and Kashmir
जम्मू-काश्मीर विधानसभेत धक्काबुक्की

यावेळी आमदार हेमंत रासने म्हणाले की,”खो-खोच्या पहिल्याच वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय पुरुष आणि महिला संघाच्या यशामुळे संपूर्ण देशभरात आनंदाचे वातावरण आहे. या विजयी संघामध्ये कसबा मतदारसंघातील अनेक खेळाडू असल्याचा अभिमान असून त्यांच्या कामगिरीने खो-खो या भारतीय पारंपरिक खेळाला जागतिक स्तरावर नवे महत्त्व मिळाले आहे. देशासाठी दैदिप्यमान करणाऱ्या खेळाडूंचे मनोबल वाढवण्यासाठी पुणेकरांच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.यापुढील काळात राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व खेळाडूंना सर्वतोपरी मदत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Story img Loader