मुंबई :  भारतीय नौदलाचे हेलिकॉप्टर बुधारी आणीबाणीच्या स्थितीत मुंबईनजिक समुद्रात उतरवण्यात आले.  हेलिकॉप्टरमधील   तीन्ही कर्मचाऱ्यांना वाचवण्यात यश आले आहे. दरम्यान या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> मुंबई: नवी निवृत्ती योजना, १५ वर्षांनंतरही धोरण निश्चितीत अपयश

भारतीय नौदलाच्या ताफ्यातील हेलिकॉप्टर बुधवारी नियमित उड्डाण करत असताना मुंबईजवळ समुद्रात आणिबाणीच्या स्थिती उतरवण्यात आले. या हेलिकॉप्टरचे मोठे नुकसान झाले असून नौदलातील तीन कर्मचाऱ्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आले.

हेही वाचा >>> मेट्रोची धाव आता उल्हासनगरपर्यंत; ‘मेट्रो ५’चा विस्तार करण्यासाठी लवकरच सल्लागारांची निवड

भारतीय नौदलाचे एएलएच मुंबईपासून नियमित उड्डाण करत असना तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे हेलिकॉप्टर समुद्रात उतरवण्यात आले. याबाबतची माहिती मिळताच  तात्काळ शोधकार्य व बचावकार्य हाती घेण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी नौदलाकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. अशी माहिती पश्चिम नौदल कमांडच्या एका अधिकाऱ्यांनी दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian navy helicopter makes emergency landing in arabian sea mumbai print news zws