भारतीय नौदलाने मोठी कारवाई करत अरबी समुद्रात माल्टा देशाचा झेंडा असलेल्या एका अपहृत मालवाहू जहाजाला समुद्री चाच्यांच्या तावडीतून यशस्वीरित्या सोडविले आहे. मालवाहू जहाज सोमालियाच्या दिशेने जात असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. भारतीय नौदलाला एक तातडीचा संदेश मिळाला होता. ज्यामध्ये सदर मालवाहू जहाजावर सहा अज्ञात लोकांकडून ताबा घेण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. नौदलाने तात्काळ अपहरणविरोधी पथक रवाना करून या जहाजाची मदत केली.

१४ डिसेंबर रोजी सहा अज्ञात इसमांनी माल्टाचे मालवाहू जहाज एमव्ही रुएन (MV Ruen) यावर गस्त घालणारी युद्धनौका आणि विमानाच्या माध्यमातून हल्ला केला. यानंतर शुक्रवारी सदर जहाजाच्या यूकेएमटीओ (United Kingdom Maritime Trade Operations) पोर्टलवरून धोक्याच्या सूचनेचा रेडिओ संदेश पाठविला गेला. ज्यामुळे या क्षेत्रात गस्त घालणाऱ्या भारतीय नौदलाला याची माहिती मिळाली. यानंतर नौदलाने चाचेगिरी विरोधी गस्ती युद्धनौका आणि एक विमान मदतीसाठी तात्काळ रवाना केले. १५ डिसेंबर रोजी या जहाजावर पाळत ठेवण्यात आली होती. त्यानंतर मदतीसाठी कार्यवाही करण्यात आली.

हे वाचा >> कान्होजी आंग्रेचा समुद्री चाचे असा उल्लेख केल्याने शिवभक्त संतापले

भारतीय नौदलाने दिलेल्या निवेदनानुसार, मालवाहू जहाजावर १८ कर्मचारी होते. भारताने मदतीसाठी धाव घेतल्यानंतर युरोपियन युनियन आणि स्पेननेही आपले जहाज मदतीसाठी रवाना केले. या अहरणामागे कोणत्या संघटनेचा हात होता, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Story img Loader