रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू झालेल्या युद्धाचा आजचा सातवा दिवस आहे. रशियाकडून युक्रेवर हवाई हल्ले सुरूच आहेत, तर युक्रेन देखील रशियासमोर शरणागती पत्कारण्यास तयार नसून रशियाला प्रत्युत्तर देत आहे. परिणामी युक्रेनचं रुपांतर सध्या युद्धभूमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर, युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी सुखरुप आणण्यासाठी केंद्र सरकारने ‘ऑपरेशन गंगा’ ही विशेष मोहीम सुरू केलेली आहे. या अंतर्गत आतापर्यंत अनेक विद्यार्थी व नागरीक सुखरूप परतले असून, विशेष विमानांद्वारे मुंबई आणि दिल्ली विमातळावर युक्रेनमधील विद्यार्थी दाखल होतच आहेत. दरम्यान, भारत सरकाच्या या मोहीमेला मदत करण्यासाठी आता भारतीय रेल्वे विभागाने देखील पुढाकार घेतला आहे.

युक्रेनमधून मुंबईत येणाऱ्यांसाठी रेल्वेने रिझर्व्हेशन आणि हेल्प डेस्क अशी सुविधा सुरू केली आहे. मुंबईतली छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. विमानतळावरील टर्मिनल 2 लेव्हल पी 4 गेट नंबर 4 या ठिकाणी रेल्वेने आपला मदत कक्ष स्थापन केला आहे. युक्रेनमधून आलेल्या विद्यार्थ्यांना आपल्या गावी जाण्यासाठी या मदत कक्षाद्वारे रेल्वेकडून विशेष आरक्षणाची सुविधा पुरवली जाणार आहे. रेल्वेच्या या पुढाकरामुळे केंद्र सरकारच्या ‘ऑपरेशन गंगा’ मोहीमस एकप्रकारे अधिकची मदतच होत आहे.

Mumbai airport international travelers
Mumbai Airport International Passengers: मुंबई विमानतळावरून १२ लाख प्रवाशांची आंतरराष्ट्रीय वारी
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Vidarbha Marathwada passengers facing problem due to no train between Nagpur to Sambhajinagar
नागपूर संभाजीनगरला जोडणारी एकही रेल्वेगाडी का नाही
Mumbai metro marathi news
मेट्रो कनेक्ट ३ ॲप ॲन्ड्रॉईड फोनवर अपडेट करू नका, एमएमआरसीचे प्रवाशांना आवाहन, तांत्रिक अडचणींमुळे अपडेट केल्यानंतर ॲप होते बंद
expansion of air india service after merger of vistara
विस्तारा’च्या विलीनीकरणातून एअर इंडियाच्या सेवेत विस्तार; विमानांचा ताफा ३०० वर, तर साप्ताहिक उड्डाणे ८,५०० वर
London–Calcutta bus service
London–Calcutta bus service: लंडन ते कलकत्ता, सर्वाधिक लांबीचा बससेवा मार्ग; कुणी चालवली ही बससेवा? कुणासाठी?
Eat Right Station certification is awarded by FSSAI
रेल्वे स्थानकावर आता बिनधास्त खा! पुणे, कोल्हापूर, साताऱ्यासह १० स्थानके ‘ईट राइट स्टेशन’
kharghar to turbhe link road work will start after maharashtra assembly election 2024
खारघर तूर्भे लिंकरोडचे काम निवडणूकीनंतर सूरु होणार

तर, राजाधीन दिल्लीमध्ये देखील युक्रेनमधून आलेल्या महाराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र सदनात मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी आलेल्या विद्यार्थ्यांना जेवण, राहण्याच्या व्यवस्थेसह त्यांना आपल्या गावी जाण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहे.

युक्रेनच्या खार्कीव्ह आणि अन्य युद्धग्रस्त शहरांतून भारतीय नागरिकांना सुखरूप मायदेशी आणण्याबाबत रशिया आणि युक्रेनच्या दूतावासाबरोबरच उभय देशांतील भारतीय दूतावासांशी संपर्कात आहेत. युद्धग्रस्त भागांतून भारतीयांना सुरक्षित बाहेर पडू देण्याबाबत २४ फेब्रुवारीपासून या दोन्ही देशांकडे वारंवार मागणी करण्यात आल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले.‘ऑपरेशन गंगा’अंतर्गत भारतीयांना सुखरूप मायदेशी आणण्यात समन्वय साधण्यासाठी केंद्रीय मंत्री हरदीप पुरी हे हंगेरी, ज्योतिरादित्य शिंदे हे रोमानिया, किरेन रिजीजू हे स्लोव्हाकीया आणि जनरल व्ही़ क़े सिंह यांना पोलंडमध्ये पाठविण्यात आले आहे.