मुंबई: परळच्या केईएम रुग्णालयांतील ह्रदयशस्त्रक्रिया गृहात एका ३८ वर्षाच्या तरुणावर तब्बल १२ तास ह्रदयप्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया सुरु होती. ही शस्त्रक्रिया यशस्वी होऊन गुरुवारी तो रुग्ण आपल्या घरी परत गेला आहे. भारतातील शासकीय रुग्णालयातील ही पहिली यशस्वी ह्रदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया असून या शस्त्रक्रियेसाठी लागणारी दोन कोटी रुपयांची उपकरणे माजी खासदार कुमार केतकर यांनी आपल्या खासदार निधीमधून दिली होती.

केईएम रुग्णालयात ११ जुलै रोजी हा ह्रदयप्रत्यारोपण शस्त्रक्रियेचा यशस्वी इतिहास घडला. त्यानंतर काही चाचण्या व योग्य औषधोपचार करून गुरुवारी १ ऑगस्ट रोजी रुग्णाला घरी पाठविण्यात आले. रुग्णाच्या ह्रदयाची पंपिंग क्षमता ६० टक्के असल्याचे ह्रदयशस्त्रक्रिया विभागाचे डॉ उदय जाधव यांनी सांगितले.

मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
MMC , complaints against doctors,
डॉक्टरांविरोधातील तक्रारींचा निपटारा करण्यात एमएमसीला यश, तक्रारींची संख्या १,७०० वरून ६०० वर
Recruitment of various posts in the State Government Service of the State Public Service Commission MPSC
एमपीएससीच्या तेवीस परीक्षांसाठी पुन्हा अर्जाची संधी, तुम्ही अर्ज केला नसेल तर…
अमरावती : शेअर बाजारात नफ्याचे आमिष; तब्बल २१.९२ लाखांची…
Many students in Pune face fatigue and mental stress due to lack of inadequate food intake
शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या अनेक विद्यार्थ्यांची आबाळ, आरोग्य सर्वेक्षणातून काय झाले उघड?
Minor boy beaten up in shop two suspects arrested
दुकानात अल्पवयीन मुलास मारहाण, दोन संशयित ताब्यात
Transfer of Rs 1500 aid under Ladki Bahin scheme resumes in Maharashtra
Ladki Bahin scheme : ६७ लाख ‘लाडक्या बहिणीं’ च्या खात्यात डिसेंबरचे पैसे जमा

आणखी वाचा-माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला

ह्रदयप्रत्यारोपण शस्त्रक्रियेचा ईतिहास पाहिला तर पहिली ह्रदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया दक्षिण आफ्रिकेचे शल्यचिकित्सक डॉ ख्रिस्तीयन बर्नाड यांनी ३ डिसेंबर १९६७ रोजी केली होती. त्यानंतर अवघ्या तीन महिन्यात मुंबई महानगरपालिकेच्या केईएम रुग्णालयात डॉ प्रफुल्ल कुमार सेन यांनी ह्रदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली होती. मात्र ही शस्त्रक्रिया यशस्वी ठरली नाही. आज ५६ वर्षांनंतर पुन्हा एकदा केईएम रुग्णालयात ह्रदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली असून रुग्ण पूर्णपणे बरा होऊन आपल्या घरी गेला आहे. आता हा रुग्ण व्यवस्थित जीवन जगू शकतो असे डॉ उदय जाधव यांनी सांगितले.

या ह्रदयप्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी कल्याण येथील एक ३४ वर्षीय महिलेचे ह्रदय मिळाला. सदर महिला सात महिन्याची गर्भवती होती काही आजाराने तिचा मेंदू मृत ( ब्रेनडेड) झाल्यानंतर तिचे पती दिपक परब यांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. बुधवारी केईएम रुग्णालयात एका छोटेखानी कार्यक्रमात दिपक परब यांचा रुग्णालयातर्फे सत्कार करण्यात आला. साधारणपणे खाजगी रुग्णालयात याच शस्त्रक्रियेसाठी सुमारे ३० ते ३५ लाख रुपये खर्च येतो मात्र आमच्याकडे यासाठी आठ लाख रुपये खर्च आला असून त्यातही महात्मा फुले जन आरोग्य योजना तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय मदत निधीमधून आर्थिक मदत मिळाल्याचे अधिष्ठाता डॉ संगीता रावत यांनी सांगितले.

आणखी वाचा-सागरी किनारा मार्गाविरोधातील याचिका न्यायालयाने फेटाळली, मार्गावरील प्रवेशयोग्य मोकळ्या जागा ठेवण्याच्या मागणीचा विचार करण्याची सूचना

मुख्य म्हणजे या ह्रदयप्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी लागणारी अत्यंत महत्वाची उपकरणे खासदार कुमार केतकर यांनी त्यांच्या खासदार निधीतून दिली. दोन कोटी रुपयांचा निधी त्यांनी दिला असून आम्ही त्यांचे आभारी असल्याचे डॉ रावत यांनी सांगितले. डॉ उदय जाधव म्हणाले, ज्यावेळी शस्त्रक्रियेसाठी परवाना घेण्यासाठी अर्ज केला तेव्हा उपकरणांची विचारणा करण्यात आली. उपकरणे नसती तर शस्त्रक्रियेसाठी परवानाच मिळाला नसता, नेमक्या त्याचवेळी खासदार केतकर यांनी आम्हाला दोन कोटी रुपये दिल्याने इकमो, अॅनॅस्थेशिया मशिन, इसीटी आदी महत्वाची उपकरणे घेता आली. या शस्त्रक्रियेसाठी बाहेरचे विख्यात सर्जन डॉ प्रवीण कुलकर्णी तसेच भूलतज्ज्ञ डॉ शेट्टी यांची मोलाची मदत झाल्याचे डॉ जाधव म्हणाले.

खासदार निधी महत्वाचा…

खासदार कुमार केतकर यांनी पाच वर्षांतील बहुतेक निधी हा रुग्णालये, शिक्षण व वाचनवृद्धीसाठी दिला आहे. केईएमच्या ह्रदयरोग विभागाला जसा दोन कोटी रुपयांचा निधी दिला तसेच येथील बालरोग विभागाला ५० लाखांचा निधी दिला. याशिवाय करोना काळात ठाणे जिल्ह्यातील दहा शासकीय रुग्णालयांना अडीच कोटी रुपये उपकरण व आवश्यक वैद्यकीय खरेदीसाठी दिला. ठाणे जिल्हा रुग्णालयाला ७५ लाखांचा निधी दिला तर सिंधुदुर्ग जिल्ह्यारुग्णालयात दंतचिकित्सा उपचारासाठी ३० लाखांचा निधी दिल्यामुळे येथील रुग्णांना आज दंतोपचारासाठी गोव्याला जावे लागत नाही.

आणखी वाचा-शीव उड्डाणपुलावरील वाहतूक बंद, प्रवासाचा वेळ वाढला

परळ येथील वाडिया रुग्णालयात लहान मुलाच्या शस्त्रक्रियेसाठी आवश्यक असलेले ५० लाख रुपयांचे उपकरण दिले. पालिकेच्या शीव रुग्णालयाला ५० लाख रुपये तर कांदिवली येथील डॉ आंबेडकर रुग्णालयाला ५० लाख रुपयांचा निधी दिला. पालघर येथील ग्रामीण रुग्णालयाला ३५ लाख रुपये तर नाशिक जिल्ह्य रुग्णालयाला २५ लाख रुपयांचा खासदार निधी दिल्यामुळे गोरगरीब रुग्णांना उपचारासाठी मोठी मदत मिळाली आहे. याबाबत कुमार केतकर यांना विचारणा केली असता ते म्हणाले, हा जनतेचा पैसा आहे. खासदारांच्या माध्यमातून काही कामे करण्यासाठी तो दिला जातो, मी तो योग्य कारणांसाठी खर्च केला यात माझे कोणतेही श्रेय नाही.

Story img Loader