आपण वेगवेगळ्या आधारित अनेक चित्रपट पाहत असतो. कधी हे चित्रपट आपल्या भाषेतले असतात, तरी कधी वेगळ्या भाषेतील असतात. असे अनेक डबिंग आर्टिस्ट आहेत ज्यांच्या आवाजात आपण हे चित्रपट आपल्या भाषेत बघू शकतो. आजच्या भागात आपण अशाच एका मराठमोळ्या डबिंग आर्टिस्टला भेटणार आहोत. या आर्टिस्टचं नाव आहे संकेत म्हात्रे.
संकेत म्हात्रे हा भारतातील प्रसिद्ध डबिंग आर्टिस्ट्सपैकी एक आहे. त्याने बेनटेन या प्रसिद्ध कार्टूनचा नायक आणि त्यातील एलियन यांना आवाज दिला असून दक्षिणात्य आणि हॉलिवूडच्या प्रसिद्ध नायकांच्या हिंदी आवाजांच्या मागचा हा एक महत्त्वाचा चेहरा आहे.
संकेत म्हात्रे याने आतापर्यंत अनेक हिंदी डब टीव्ही मालिका, वेबसिरीज, कार्टून्स, दक्षिणात्य तसेच हॉलीवूडच्या सिनेमांसाठी आवाज दिला आहे. बेअर ग्रील्सला दिलेला आवाज हा त्याच्या अनेक प्रसिद्ध आवाजांपैकी एक आहे. ‘डेडपूल’ मधील त्याचा आवाज त्यावेळी बराच गाजला होता.
‘गोष्ट असामान्यांची’ या मालिकेतील इतर एपिसोड पाहण्यासाठी येथे क्लिक करा.