शीना बोराचे अपहरण करून तिची हत्या करण्याच्या आदल्या दिवशी तिची आई इंद्राणी मुखर्जी हिने आपल्या वाहनचालकासोबत संपूर्ण परिसराची पाहणी केली होती, अशी माहिती पोलीसांनी शुक्रवारी दिली.
२४ एप्रिल २०१२ रोजी वांद्रे येथील नॅशनल महाविद्यालयाजवळून शीनाचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर तिची गळा दाबून हत्या करण्यात आली. अपहरण कुठून करायचे आणि मृतदेहाची विल्हेवाट कुठे लावायची, याचा कट आधीच शिजला होता. त्याप्रमाणे इंद्राणी मुखर्जीने वाहनचालक श्याम राय याच्यासोबत घटनेच्या आदच्या दिवशीच परिसराची पाहणी केली होती. शिनाचा मृतदेह सुटकेसमध्ये भरून दुसऱय़ा दिवशी पेण येथील गोगादे खुर्द येथील जंगलात जाळून टाकण्यात आला. या जागेचीही इंद्राणीने आधीच पाहणी केली होती, असे पोलीसांनी सांगितले.
शीना बोराच्या हत्येमागे कारण काय आहे, याचा पोलीस तपास करीत आहेत आणि शुक्रवारी रात्रीपर्यंत त्याबाबत माहिती मिळू शकेल, असे मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी म्हटले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा