शिना बोरा हत्याकांडातील प्रमुख आरोपी असलेल्या इंद्राणी मुखर्जीने आपल्याला वारंवार चक्कर येत असल्याचे कारण देत शुक्रवारी सीबीआयच्या विशेष न्यायालयात वैद्यकीय आधारावर जामीन अर्ज दाखल केला. मुखर्जी यांच्या वकिलांनी जामिनासाठी केलेल्या १७ पानी अर्जामध्ये इंद्राणी यांची तब्येत खालावत असून मागील चार महिन्यांमध्ये तिचे वजन १८ किलोग्रॅमने घटले असल्याचा दावा केला आहे. यात इंद्राणीला तणावमुक्त वातावरणात राहण्याची इच्छा असल्याचेही म्हटले गेले आहे.

Story img Loader