शिना बोरा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी शुद्धीवर आली असून, इंद्राणीची प्रकृती स्थिर आहे. तरी तिला पुढील काही तास तिला डॉक्टरांच्या देखरेखखाली ठेवण्यात येणार असल्याची माहिती जे जे रुग्णालयाचे डीन डॉ. तात्याराव लहाने यांनी दिली आहे.
आज इंद्राणीच्या दोन वेगवेगळ्या चाचण्या करण्यात आल्या. फॉरेन्सिक लॅबच्या अहवालानुसार इंद्राणीच्या रक्तात कुठेही रसायन आढळलेले नाही. दरम्यान, मानसोपचार तज्ज्ञांच्या सल्ल्यानंतरच इंद्रणीला उद्या रुग्णालयातून सोडण्यात येईल, असे डॉ. तात्याराव लहाने यांनी स्पष्ट केले.
शुक्रवारी इंद्राणी हिने ताणतणावावरील गोळ्यांचे अतिसेवन केल्याने ती बेशुद्धावस्थेत आढळली होती. त्यानंतर तिला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. भायखळा कारागृहात इंद्राणी काही दिवसांपासून नैराश्यग्रस्त दिसत होती. मानसोपचारतज्ज्ञांच्या सल्ल्याने तिला या तणावाच्या गोळ्या दिल्या जात होत्या. तसा अहवाल कारागृह प्रशासनाने सादर केला आहे; पण इंद्राणीकडे अतिरिक्त गोळ्यांचा डोस कसा आला याची चौकशी सुरू आहे. या घटनेनंतर सीबीआयचे पथक घटनास्थळी पोहोचले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा