शीना बोरा हत्याकांड प्रकरणातील प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जीला डेंग्यूची लागण झाल्याची माहिती बुधवारी भायखळा कारागृहातील अधिकाऱ्यांनी न्यायालयाला दिली. इंद्राणी मुखर्जीच्या रक्तातील प्लेटलेट्सचे प्रमाण एकदम कमी झाले असून, तिला उपचारांसाठी जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
इंद्राणीच्या रक्तातील प्लेटलेट्सची संख्या ६५ हजारांपर्यंत खाली आली असून, तिला सातत्याने ताप येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. कारागृहात प्राथमिक उपचार केल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही दिवसांपूर्वीच इंद्राणी मुखर्जीला अत्यवस्थ वाटू लागल्याने जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ताणमुक्तीसाठीच्या गोळ्यांचे अतिसेवन केल्याने ती बेशुद्ध पडली होती. चार डॉक्टरांचे विशेष पथक तिच्यावर उपचार करत होते. तिच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यावर पुन्हा तिची रवानगी कारागृहात करण्यात आली होती.
इंद्राणी मुखर्जीला डेंग्यू, जेजे रुग्णालयात दाखल
इंद्राणी मुखर्जीच्या रक्तातील प्लेटलेट्सचे प्रमाण एकदम कमी झाले आहे.
Written by विश्वनाथ गरुड
First published on: 28-10-2015 at 15:59 IST
TOPICSइंद्राणी मुखर्जी
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indrani mukerjea suffering from dengue