मुंबई: शीना बोरा हत्येप्रकरणी गेल्या साडेसहा वर्षांहून अधिक काळ अटकेत असलेली प्रमुख आरोपी आणि शीनाची आई इंद्राणी मुखर्जी हिला बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. या प्रकरणातील सहआरोपी आणि इंद्राणीचा दुसरा पती पीटर मुखर्जीला २०२० मध्ये उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. ती बाब सर्वोच्च न्यायालयाने इंद्राणीला जामीन मंजूर करताना विचारात घेतली. यापूर्वी सीबीआयने इंद्राणीच्या जामिनाला विरोध केला होता. इंद्राणीने स्वत:च्याच मुलीच्या म्हणजेच शीनाच्या हत्येचा कट रचला आणि तिची हत्या केल्याचा सीबीआयचा आरोप आहे. इंद्राणीने अनेक वेळा जामिनासाठी अर्ज केला. मात्र सत्र आणि उच्च न्यायालयाकडून तिला दिलासा मिळाला नाही. उच्च न्यायालयाच्या एकलपीठाने जामीन नाकारल्याच्या निर्णयाविरोधात इंद्राणीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर १८ फेब्रुवारीला न्यायालयाने इंद्राणीच्या याचिकेवर सीबीआयला नोटीस बजावून उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा