मुंबई : मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखकर आणि आरामदायी व्हावा, यादृष्टीने बेस्ट उपक्रमाच्या बस ताफ्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. मुंबई सेंट्रल आगारातून १० नवीन विद्युत वातानुकूलित एकमजली बस प्रवर्तित करण्यात येत आहेत. या बस ‘ए – ३५१’ मार्गावर मुंबई सेंट्रल आगार – टाटा वीजसंग्राही केंद्र यादरम्यान धावण्यास सुरुवात झाली आहे.
बसची लांबी १२ मीटर असून, यामधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून नाममात्र बसभाडे घेण्यात येणार आहे. बेस्ट उपक्रमाने ऑलेक्ट्रा या संस्थेला २,१०० बस पुरवण्याचे कार्यादेश दिले आहे. आतापर्यंत ३० बसचा पुरवठा करण्यात आला असून, लवकरच उर्वरित बसचा पुरवठा होईल, असा विश्वास बेस्ट उपक्रमाकडून व्यक्त करण्यात आला.