जिरे ६५० रुपये किलो तर आले, लसूणही असह्य

मुंबई : आधी लांबलेला पाऊस आणि नंतर अतिवृष्टी यामुळे उत्पादनावर परिणाम होऊन भाज्यांचे दर ग्राहकांना धडकी भरवत असतानाच, डाळींसह विविध जिन्नसांच्या महागाईने सर्वसामान्यांचे जेवण ‘बेचव’ केले आहे. गेल्या १५ दिवसांत तूरडाळ, मूगडाळ, शेंगदाणा, साबुदाणा यांच्या दरांनी उसळी घेतली आहे तर, जिरा, लसूण, हळद, आले या फोडणी-मसाल्यासाठीच्या जिन्नसांचे दरही चांगलेच वधारले आहेत.

Mission on Oilseeds in Crisis due to gm soybeans
जीएम सोयाबीन विना तेलबिया मिशन संकटात
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Garlic Rate, Vegetable Rate, Pune, Garlic,
लसूण महागला, परराज्यातील लसणाची आवक कमी
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
Kitchen jugad video orange peel and milk scrub for tanning skin
Kitchen Jugaad: दुधात संत्र्याची साल टाकताच कमाल झाली; Video पाहाल तर दररोज कराल हा उपाय
Onion garlic became expensive while the prices of cotton soybeans decreased
ग्राहक, शेतकरी चिंतेत; कांदा, लसूण महागले तर कापूस, सोयाबीनचे दर पडल्याने नाराजी
Increase in cotton soybean prices print politics news
कापूस, सोयाबीनच्या दराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; निवडणूक काळात शेतकऱ्यांमध्ये रोष
Onion garlic shortage
बाजारात कांदा, लसणाचा तुटवडा ? जाणून घ्या, कांदा, लसणाच्या दरातील तेजी किती दिवस

धान्य तसेच अन्य जिन्नसांच्या दरांची गेल्या महिन्यातील दरांशी तुलना केल्यास ही वाढ सहज दिसून येते. त्यापेक्षाही लक्षणीय बाब म्हणजे, गतवर्षीच्या ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ातील घाऊक दरांशी तुलना करता दरांमध्ये १५ ते ३०० टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचे दिसून येते. वर्षभरात लसणाचे दर किलोमागे ३०० टक्क्यांनी महागल्याचे केंद्र सरकारच्या ‘अ‍ॅगमार्कनेट’ या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीवरून दिसते. त्याचप्रमाणे जिऱ्याचे दरही एक वर्षांपूर्वीच्या २०० रुपये किलोवरून सध्या ६५० ते ७०० रुपये किलोवर पोहोचल्याचे या संकेतस्थळावर एकत्रित करण्यात आलेल्या कृषी उत्पन्न बाजारसमित्यांमधील दरतालिकेवरून दिसते. अशीच वाढ साखर, शेंगदाणे, साबुदाणा, शेंगदाणे तेल यांच्या दरांतही दिसून येते.

गेल्या पंधरवडय़ातच अनेक जिन्नसांचे दर वधारल्याचे ‘लोकसत्ता’च्या प्रतिनिधींनी राज्यातील विविध शहरांत केलेल्या पाहणीत आढळले. मराठवाडय़ातील दरवाढीस पाऊस नसल्याचे कारण व्यापाऱ्यांकडून पुढे केले जात आहे. लातूरच्या बाजारपेठेत डाळींचे भाव वाढले असून २० जुलैदरम्यान घाऊक बाजारात १३८ रुपये किलो असणारी तूर डाळ आता १४५ रुपयांवर पोहोचली आहे. मूग डाळ, मसूर डाळ यांच्या दरांतही किलोमागे दोन रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. गत वर्षभरात तूरडाळीच्या दरांत किलोमागे ३१ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीत तूरडाळ ९५ ते १३५ रुपये किलोने विकली जात आहे तर, पुण्यातील स्थानिक बाजारांत या डाळीच्या दरांनी पावणेदोनशेचा टप्पा गाठला आहे. पुण्यात मूगडाळीसह सर्वच डाळींचे दर किलोमागे शंभरीपार पोहोचले आहेत.

  • गत वर्षभरात तूरडाळीच्या दरांत किलोमागे ३१ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. 
  • मूग डाळ, मसूर डाळ यांच्या दरांतही किलोमागे दोन रुपयांपर्यंत वाढ झाली आहे.

‘अ‍ॅगमार्कनेट’नुसार गेल्या महिन्यात ९० रुपये किलोच्या आसपास असलेल्या लसणाचे घाऊक बाजारातील दर ११० ते १२० रुपयांवर पोहोचले आहेत. हळदीचे घाऊक दर प्रतिकिलो १६० रुपयांवर पोहोचले आहेत. गतवर्षीच्या दरांच्या तुलनेत सध्या हळदीचे दर दुप्पट झाल्याचे दिसते.

टोमॅटो वाढता वाढे

गेल्या महिन्याभरापासून वाढलेल्या टोमॅटोच्या दरांमध्ये घसरण होण्याऐवजी वाढच होत आहे. मुंबईसह राज्यभरात अनेक शहरांत टोमॅटोचे दर दीडशे रुपयांच्या आसपास आहेत. नागपूरमधील किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर २०० ते २५० रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत.

आवक घटल्याने भाज्या महाग

नाशिक/ठाणे : जून महिन्यात पावसाने ओढ दिल्याने भाजीपाल्याच्या लागवडीवर परिणाम झाला होता तर, जुलैमध्ये अतिवृष्टीमुळे हाती येणारे पीक पाण्यात गेले. त्यामुळे भाज्यांची आवक बाजारात घटली असून त्याचा परिणाम दरवाढीमध्ये झाला आहे.  कारले, दोडके, गिलके, भेंडी, ढोबळी मिरची आदींची आवक कमी होऊन दर २० ते २५ टक्क्यांनी वाढले आहेत.