मुंबई : Gharguti Ganpati Festival गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले असून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांप्रमाणे घराघरांतील तयारीही अंतिम टप्प्यात आहे. गतवर्षी अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाबाबत सर्वांमध्ये उत्साही वातावरण होते. त्यामुळे श्री रामाच्या रूपातील गणेशमूर्ती विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये दिसल्या होत्या. अखेर २२ जानेवारीला अयोध्येतील बहुप्रतीक्षित राम मंदिराचे उद्घाटन आणि मंदिरात प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाली. यंदा या मंदिरातील प्रभू रामचंद्रच्या मूर्तीचा प्रभाव घरगुती गणेशमूर्तींवर दिसत आहे.

हेही वाचा >>> म्हाडा मुंबई मंडळाच्या २०३० घरांसाठी सोडत, लवकरच सोडतीच्या तारखेची घोषणा

Three people were killed and three others were injured after roof of building collapsed
मुंबई : इमारतीच्या २० व्या मजल्यावरील छताचा भाग कोसळून तिघे ठार, तिघे जखमी
15th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१५ सप्टेंबर पंचांग: आनंदाची वार्ता ते प्रेम, मैत्रीची साथ; १२ पैकी कोणत्या राशीचा हसत-खेळत जाणार रविवार; वाचा तुमचे राशिभविष्य
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
Mumbai Bus Accident
Mumbai Bus Accident : चालकाला ढकलून मद्यपीने हिसकावलं स्टीअरिंग, लालबागमध्ये मोठा बस अपघात, तरुणीचा मृत्यू, आठ जण जखमी
Narendra modi on Surat Loot
Surat Loot : सूरतेची महाराजांची लूट आणि मोदींचे १० वर्षांपूर्वीचे उद्गार… नक्की ऐका
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Director Called Me Daughter and Raped said Actress
Kerala Actress : “दिग्दर्शक मला म्हणायचा तू मुलीसारखी आहेस, त्याने वर्षभर बलात्कार केला आणि..”, अभिनेत्रीची आपबिती

मूर्तीकारांनी कल्पकतेने घडवलेल्या भव्य आणि विविध रूपातील गणेशमूर्ती हे मुंबईतील गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य आहे. याच गणेशमूर्तींचा प्रभाव यंदा घरगुती गणेशमूर्तींवरही पडलेला पाहायला मिळत आहे. यंदा घरगुती गणेशोत्सवासाठी अयोध्येतील राम मंदिरातील प्रभू श्रीरामाच्या रूपातील आणि मुंबईतील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील भव्य गणेशमूर्तींच्या ‘प्रतिकृती’ तयार करण्यात आल्या आहेत. या गणेशमूर्तींना नागरिकांचीही चांगली पसंती मिळत आहे. श्रीरामाच्या रूपातील घरगुती गणेशमूर्ती या ३ ते ५ फुटांपर्यंत उपलब्ध आहेत. या गणेशमूर्तींवर हिरे जडविण्यात आले आहेत. सुमारे २२ ते २६ फुटांच्या भव्य गणेशमूर्तींच्या प्रतिकृती या घरगुती गणेशोत्सवासाठी अडीच ते पाच फुटांपर्यंत तयार करण्यात आल्या आहेत. या मूर्ती पीओपी आणि शाडू माती अशा दोन्ही रूपात साकारण्यात आल्या आहेत.

हेही वाचा >>> मेट्रो ३ प्रकल्पात स्थानकांच्या बांधकामासाठी झाडे तोडल्याचे प्रकरण, ३०९३ झाडांपैकी केवळ ७२४ झाडांचेच पुनर्रोपण

दरम्यान, भव्य गणेशमूर्ती घडविण्यासाठी लालबाग, परळ, करी रोड, चिंचपोकळी, भायखळा याठिकाणी असलेल्या कार्यशाळांमध्ये मे – जूनच्या दरम्यानच सुरुवात होते. या भव्य गणेशमूर्ती सर्वांनाच आकर्षित करत असतात. त्यामुळे यंदा लालबागचा राजा, लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाचा गणेशगल्लीतील गणपती, चिंचपोकळीचा चिंतामणी, काळाचौकीचा महागणपती, खेतवाडी ११ वी गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा गणपती, अखिल चंदनवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा गणपती आदी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील भव्य गणेशमूर्तींच्या प्रतिकृती या घरगुती गणेशोत्सवासाठी साकारण्यात आल्या आहेत.

‘मुंबईतील भव्य गणेशमूर्तींचे सर्व नागरिकांना आकर्षण असते. विविध रूपातील आणि भव्य गणेशमूर्तींची प्रतिकृती ही घरगुती गणेशोत्सवात असावी, अशी नागरिकांची इच्छा असते. यापूर्वी लालबागचा राजा आणि चिंचपोकळीचा चिंतामणी या गणेशमूर्तींच्या प्रतिकृती असायच्या. मात्र यंदा इतरही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विविध रूपातील गणेशमूर्तींच्या प्रतिकृती सर्वाधिक आहेत’, असे एका मूर्तिकाराने सांगितले.

अयोध्येतील प्रभू रामचंद्र व चंदनवाडी सार्वजनिक मंडळाची गणेशमूर्तीची प्रतिकृती

श्रीरामाच्या रूपातील घरगुती गणेशमूर्ती या ३ ते ५ फुटांपर्यंत उपलब्ध आहेत. या गणेशमूर्तींवर हिरे जडविण्यात आले आहेत. २६ फुटांच्या मूर्तींच्या प्रतिकृती या अडीच ते पाच फुटांपर्यंत आहेत.