मुंबई : भारतात क्वचितच दिसणारा मालदीवचा सागरी पक्षी लेसर नॉडी रविवारी सीवूड्स एनआरआय परिसरात जखमी अवस्थेत आढळला होता. दरम्यान सोमवारी उपचारादरम्यान या पक्ष्याचा मृत्यू झाला. परिसरात अनेक स्थलांतरित पक्षी निवास करत असतानाही तेथे पशुवैद्यकीय रुग्णालय नसल्याने अनेक वन्य प्राणी आणि पक्षी मृत्यूमुखी पडत असल्याचे मत वन्यजीव संवर्धन क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे.

नवी मुंबईतील नेरुळ येथील एनआरआय परिसरात लेसर नॉडी नावाचा पक्षी तेथील स्थानिक रहिवासी दीपक रामपाल यांना जखमी अवस्थेत आढळला. त्यांनी वन्यजीव कल्याण संघटनेशी (डब्ल्यूडब्ल्यूए) संपर्क साधला. संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी पक्ष्याला ठाण्यातील वन्यजीव पुनर्वसन केंद्रात उपचारासाठी दाखल केले. सोमवारी उपचारादरम्यान या पक्ष्याचा मृत्यू झाला. बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीने (बीएनएचएस) हा पक्षी संशोधनासाठी वनविभागाकडून ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Farmer killed in tiger attack
वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
russian spy whale mystery
बहुचर्चित बेलुगा व्हेलचे रहस्य उलगडले; हा मासा खरंच रशियन गुप्तहेर होता का?
Panje Dongri wetlands, Uran, dry
उरण : आंतरभरती प्रवाह बंद झाल्याने पाणजे पाणथळ कोरडी
Golden fox dead in Kharghar, Golden fox, Kharghar,
खारघरमध्ये सुवर्ण कोल्हा मृतावस्थेत
majority of bird species in india face decline
देशातील पक्ष्यांच्या संख्येत लक्षणीय घट; जाणून घ्या, मानवी चुका किती हानीकारक
rare ornate flying snake found in Sahyadri
सावंतवाडी: सह्याद्रीच्या पट्ट्यात घोटगेवाडी येथे दुर्मिळ उडता सोनसर्प आढळला
इयन बोथम आणि मर्व्ह ह्यूज
मैदानावरच्या हाडवैरीने वाचवला मगरींच्या तावडीतून जीव; इयन बोथम यांनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग

हेही वाचा…७५ वर्षापासूनची बेस्ट उपक्रमाची सेवा ठप्प होण्याच्या मार्गावर, बेस्टचा स्वमालकीचा ताफा वाचवण्यासाठी ‘बेस्ट बचाओ’कडून पुढाकार

दरम्यान, नवी मुंबईत पशुवैद्यकीय रुग्णालय नसल्यामुळे या जखमी पक्षाला सुमारे ३० किमी दूर असलेल्या वन्यजीव पुनर्वसन केंद्रात न्यावे लागले. दुर्दैवाने पक्ष्याला वाचवता आले नाही, असे डब्ल्यूडब्ल्यूएचे बचावकर्ते सनप्रीत सावर्डेकर आणि मयूर दळवी यांनी सांगितले. नवी मुंबईत पशुवैद्यकीय रुग्णालय सुरू करण्याची गरज आहे असे मत पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केले आहे. नवी मुंबईत फ्लेमिंगो आणि इतर अनेक पक्षी स्थलांतर करुन येतात. जुईनगर येथील पशुवैद्यकीय रूग्णालयाची बांधलेली इमारत तीन वर्षांपासून तयार असूनही कार्यान्वित नाही, यामुळे पक्ष्यांचे वाढते मृत्यू ही आता चिंतेची बाब बनली आहे असे पर्यावरणप्रेमी बी.एन.कुमार यांनी सांगितले. तसेच पशुवैद्यकीय रुग्णालय नवी मुंबईत नसल्यान पक्ष्यांव्यतिरिक्त, अनेक पाळीव प्राणी आणि भटके प्राणी आजारी पडतात, अपघातात जखमी होतात आणि ते वैद्यकीयदृष्ट्या दुर्लक्षित होतात ही एक दुःखद बाब आहे, असे प्राणी कार्यकर्ते ज्योती नाडकर्णी यांनी सांगितले.