राज्यभरातील नाटय़वेडय़ा तरुणांच्या कल्पकतेचा आणि सृजनशीलतेचा कस लावणाऱ्या लोकसत्ता लोकांकिका या आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरीचे शेवटचे दोन टप्पे ठाणे आणि मुंबईत १३ आणि १४ डिसेंबर रोजी पार पडणार आहेत. मुंबई आणि ठाणे विभागातील नाटय़वेडय़ा तरुणांची कल्पकता, प्रयोगशीलता आणि नाविन्य या गोष्टींचा संगम या एकांकिका स्पर्धेत पाहण्याची संधी मिळणार असून त्यासाठी विनामूल्य प्रवेशिका उपलब्ध आहेत.
सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत आणि भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या सहकार्याने होणाऱ्या या स्पर्धेच्या या विभागीय अंतिम फेरीसाठीच्या नि:शुल्क प्रवेशिका गुरुवारपासून उपलब्ध झाल्या आहेत. ही स्पर्धा ‘अस्तित्व’ संस्थेच्या सहकार्याने होत असून झी मराठी या स्पर्धेचे इलेक्ट्रॉनिक माध्यम प्रायोजक आहेत.
ठाणे विभागाची अंतिम फेरी १३ डिसेंबर रोजी राम गणेश गडकरी रंगायतन येथे रंगणार आहे. या फेरीसाठीच्या प्रवेशिका ‘लोकसत्ता’च्या ठाणे कार्यालयात सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत मिळतील.
मुंबई विभागाची अंतिम फेरी १४ डिसेंबर रोजी दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात होईल. तिच्या प्रवेशिका स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात सकाळी ८.३० ते ११ आणि सायंकाळी ५ ते रात्री ८.३० या वेळेत मिळतील. या प्रवेशिका ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर देण्यात येतील. या फेरीसाठीच्या प्रवेशिका ‘लोकसत्ता’च्या ठाणे कार्यालयात सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत मिळतील.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा