निवडणुकीच्या तोंडावर सरकार आणि स्थानिक अधिकाऱ्यांना हाताशी धरून बोगस कागदपत्रांच्या आधारे अनुदानाची कोटय़वधी रुपयांची खिरापत पदरात पाडून घेणाऱ्या तब्बल १३०० शाळांची चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या सर्व शाळांची पुन्हा एकदा त्रयस्थ यंत्रणेच्या माध्यमातून चौकशी होणार आहे. त्यात दोषी आढणाऱ्या संस्था आणि अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या दरम्यान राज्य शासनाने तब्बल १८०० शाळांना कोटय़ावधी रुपयांचे अनुदान मंजूर केले. याच दरम्यान अनुदानासाठी दाखल झालेल्या ४६९ प्रस्तावांमध्ये गडबड असल्याचे उघडकीस आले. धुळे, औरंगाबाद, बीड, जालना ,परभणी, हिंगोली या जिल्यातील ४६९ शाळांची त्रयस्थ यंत्रणेच्या माध्यमातून चौकशी करण्यात आली असता, तब्बल ३१६ शाळा अनुदानासाठीअपात्र आणि केवळ १५३ शाळा पात्र ठरल्या आहेत. या शाळांनी शिक्षण विभागाच्या स्थानिक अधिकाऱ्यांना हाताशी धरून बोगस प्रस्ताव मंजूर करून घेतल्याचेही उघडकीस आले आहे.
आणखी १३०० शाळांची त्रयस्थ यंत्रणेकडून चौकशी होणार
निवडणुकीच्या तोंडावर सरकार आणि स्थानिक अधिकाऱ्यांना हाताशी धरून बोगस कागदपत्रांच्या आधारे अनुदानाची कोटय़वधी रुपयांची खिरापत पदरात पाडून घेणाऱ्या तब्बल १३०० शाळांची चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
First published on: 26-11-2014 at 03:16 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Inquiry of 1300 schools by third party authorities