आदिवासी विभागाने ब्लँकेट, चिक्की खरेदीत केलेल्या घोटाळ्याची अप्पर मुख्य सचिवांच्या माध्यमातून चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आदिवासी विभागाच्या मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी आश्रम शाळांसाठी ब्लँकेट, चिक्की आणि प्रोटीन अशी सुमारे १०० कोटींची खरेदी केली. मात्र अनेक ठिकाणी मागणी नसतानाही ही खरेदी करण्यात आली. चिक्की खरेदीवरून या विभागाचे तत्कालीन मंत्री बबनराव पाचपुते आणि राज्यमंत्री राजेंद्र गावीत यांच्यात जोरदार वाद झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ही खरेदीच रोखली होती.
या सर्वच खरेदीत मोठय़ा प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांकडून करण्यात आला होता. त्यानंतर आदिवासी विभागाने केलेल्या प्राथमिक चौकशीतही घोटाळ्याची बाब उघडकीस आली असून आता या संपूर्ण घोटाळ्याची अप्पर मुख्य सचिव पी.एस. मीना यांच्या माध्यमातून चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती या विभागाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा