भारतीय नौदलाच्या INS ब्रह्मपुत्रा या जहाजाला अचानक आग लागली होती. ही युद्धनौका मुंबईतील नेव्हल डॉकयार्डमध्ये असताना रविवारी संध्याकाळी आग लागली होती. ही आग सोमवारी सकाळी विझवण्यात आली. मात्र, आता ही युद्धनौका एका बाजूला झुकली आहे. या घटनेनंतर एक खलाशीही बेपत्ता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रविवारी सायंकाळी आगीच्या घटनेनंतर सोमवारी दुपारी जहाज एका बाजूला झुकलेले दिसले. सर्व प्रयत्न करूनही जहाज सरळ स्थितीत आणता आले नाही. जहाज धक्क्यावर हळू-हळू सरकले आणि सध्या एका बाजूला उभे आहे. एक कनिष्ठ खलाशी वगळता सर्व कर्मचाऱ्यांचा शोध लागला असून, बेपत्ता खलाशाचा शोध सुरू आहे. भारतीय नौदलाने या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. नौदलाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी संध्याकाळी मुंबई नेव्हल डॉकयार्डमध्ये INS ब्रह्मपुत्रा दुरुस्तीचे काम सुरू असताना आग लागली.

हेही वाचा >> आयएनएस ‘विक्रांत’ प्रकरण : प्रकरण बंद करण्याबाबत दाखल पोलिसांच्या अहवालावर लवकर निर्णय घ्या – उच्च न्यायालय

जहाज एका बाजूला वाकले

नौदलाने एका निवेदनात म्हटले आहे की, “जहाजातील क्रू सदस्यांनी अग्निशमन दलाच्या सहकार्याने सोमवारपर्यंत नेव्हल डॉकयार्ड, मुंबई येथील INS ब्रह्मपुत्रा जहाजाला लागलेली आग अटोक्यात आणली. दुपारनंतर, जहाज एका बाजूला झुकू लागले आणि सर्व प्रयत्न करूनही ते सरळ स्थितीत आणले जाऊ शकले नाही.

हेही वाचा >> प्रश्न एक, उत्तरे दोन; NEET UG मधील आणखी एक घोळ सर्वोच्च न्यायालयात, सरन्यायाधीशांनी दिले चौकशीचे आदेश!

आयएनएस ब्रह्मपुत्रा जहाजाचे वैशिष्ट्य काय?

INS ब्रह्मपुत्रा हे पहिले स्वदेशी बनावटीचे ‘ब्रह्मपुत्रा’ वर्गाचे मार्गदर्शित क्षेपणास्त्र फ्रिगेट आहे. ते एप्रिल २००० मध्ये भारतीय नौदलात सामील झाले होते. जहाजावर ४० अधिकारी आणि ३३० खलाशी आहेत. जहाज मध्यम पल्ल्याच्या, जवळच्या अंतरावरील आणि विमानविरोधी शस्त्रे, पृष्ठभागावरून जमिनीवर आणि जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे आणि टॉर्पेडो लाँचर्सने सुसज्ज आहे. या जहाजामध्ये सागरी युद्धाच्या सर्व पैलूंचा समावेश करणारे सेन्सर्सची विस्तृत श्रेणी आहे आणि ते सीकिंग आणि चेतक हेलिकॉप्टर चालविण्यास सक्षम आहे. INS ब्रह्मपुत्रेचे विस्थापन ५ हजार ३०० टन, लांबी १२५ मीटर, बीम १४.४ मीटर आहे आणि ती २७ नॉट्सपेक्षा जास्त वेगाने काम करण्यास सक्षम आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ins brahmaputra suffers massive fire the warship tilts to one side sgk