लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : राज्यातील बनावट औषध विक्रीला आळा घालण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) परराज्यातून मागविण्यात येणाऱ्या औषधांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार अन्न आणि औषध प्रशासनाने परराज्यातून येणाऱ्या औषधांची तपासणी सुरू केली असून, राज्यात येणाऱ्या प्रत्येक औषधाची माहिती घेण्यात येत आहे.

Dawood Ibrahim latest news in marathi
दाऊदच्या साथीदाराला २९ वर्षांनी अटक, आर्थररोड कारागृहात केली होती दंगल
st mahamandal upi ticket loksatta
ST Bus Tickets UPI : सुट्ट्या पैशाच्या वादावर…
Mumbai carnac Railway Flyover marathi news
कर्नाक रेल्वे उड्डाणपुलाची तुळई रेल्वे मार्गावर स्थापन, पुलाच्या उर्वरित कामाना वेग येणार, पूल जूनपर्यंत सुरू करण्याचे उद्दिष्ट्य
dilapidated, bridge, Mumbai, traffic ,
मुंबईतील आणखी एक पूल जीर्ण, पुनर्बांधणीसाठी वाहतूक बंद
good feelings song Cold Play show ahmedabad Satyajit Padhye puppet show
‘कोल्ड प्ले’च्या मंचावर सत्यजित पाध्ये आणि सहकारी, ‘गुड फिलिंग्स’ गाण्यावर बोलक्या बाहुल्यांचे लक्षवेधी सादरीकरण
Ashish Shelar , Marathi Film Katta , Versova,
यंदाचे वर्ष मराठी माणसांसाठी आनंददायी – ॲड. आशिष शेलार, वर्सोवा येथे ‘मराठी चित्रपट कट्टा’चे लोकार्पण
marathi actor pratap phad marathi news
‘ब्लॅक वॉरंट’मधील ‘सनी त्यागी’ ठरतोय लक्षवेधी; मराठमोळा दिग्दर्शक प्रताप फड यांच्या अभिनयाचे कौतुक
Saif Ali Khan attack case, Saif Ali Khan,
सैफ हल्ला प्रकरण : आरोपीचा चेहऱ्याच्या पडताळणीचा अहवाल पोलिसांना प्राप्त, न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल
cancer warning , alcohol bottles,
मद्याच्या बाटल्यांवर कर्करोगाच्या धोक्याचा इशारा लिहा, जनहित याचिकेद्वारे मागणी

देशामध्ये मोठ्या प्रमाणावर औषधांची निर्मिती करणारे उत्पादक हिमाचल प्रदेशमधील बद्दी परिसरात आहेत. त्याचबरोबर गुजरात व उत्तरांचलमध्ये मोठ्या प्रमाणात औषधांची निर्मिती केली जाते. त्यामुळे राज्यातील घाऊक आणि किरकोळ औषध विक्रेते मोठ्या प्रमाणात परराज्यातून औषधांची खरेदी करतात. या राज्यांतून येणारी अनेक औषधे प्रमाणित दर्जानुसार नसतात. त्यामुळे राज्यामध्ये बनावट व निकृष्ट दर्जाची औषधे मिळण्याची शक्यता आहे. परराज्यातून मागविण्यात येणाऱ्या औषधांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाने सर्व वितरकांकडे त्यांनी मागविलेल्या औषधांचा तपशील ई-मेलद्वारे सादर करण्याचे आदेश दिले होते.

आणखी वाचा-म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सोडतीसाठी २४ हजार अर्जदार पात्र

प्रशासनाने विभागनिहाय ई-मेल आयडी तयार करून तपशीलांची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार घाऊक आणि किरकोळ विक्रेत्यांनी खरेदी केलेल्या औषधांची सर्व विभागीय सहआयुक्त, सहायक आयुक्त व औषध निरीक्षकांद्वारे तपासणी करण्यात येत आहे. या तपासणीला वितरकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. वितरकांकडून आलेल्या माहितीचे काटेकोरपणे निरीक्षण व तपासणी करण्यात येत आहे. आतापर्यंत केलेल्या तपासणीमध्ये बनावट औषधांचा तपशील सापडलेला नाही. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये ही कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दिली.

Story img Loader