लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: ‘दहिसर – गुंदवली मेट्रो ७’ मार्गिकेवरील गुंदवली मेट्रो स्थानकालगतचा रस्ता खचला असून मेट्रो स्थानकातील उत्तरेकडील एक प्रवेशद्वार, उद्वाहक आणि सरकता जिना प्रवाशांसाठी बंद करण्यात आला आहे. खचलेल्या रस्त्याची आयआयटीतील तज्ज्ञांमार्फत तपासणी करण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) घेतला आहे. यासंदर्भात आयआयटीच्या तज्ज्ञांकडून उपाययोजनांबाबत शिफारसी करण्यात येणार असून त्यांची अंमलबजावणी करण्यात येईल, असे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

पश्चिम द्रुतगती महामार्गावरील मागाठाणे मेट्रो स्थानकालगत एका प्रकल्पाचे काम सुरू आहे. या कामाअंतर्गत खोदकाम करताना जमीन खचल्याची घटना मागील आठवड्यात घडली. मेट्रो स्थानकातील उत्तरेकडील प्रवेशद्वार, सरकता जिना आणि उद्वाहकानजिकची जमीन खचल्याने सुरक्षेच्या दृष्टीने महा मुंबई मेट्रो संचलन महामंडळाने (एमएमएमओसीएल) तात्काळ प्रवेशद्वार, उद्वाहक आणि सरकता जिना प्रवाशांसाठी बंद केला. या घटनेनंतर विकासकाच्या कामाबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे. विकासकाला महानगरपालिकेने काम थांबविण्याचे आदेश दिले असून पोलिसही याप्रकरणी कारवाई करीत आहेत.

आणखी वाचा-मुंबई: चुनाभट्टीमधील रस्ता खचला

दुसरीकडे आता एमएमआरडीए आणि एमएमएमओसीएलकडूनही खचलेल्या रस्त्याची संरचनात्मक तपासणी करण्यात येत आहे. या घटनेनंतर मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस) यांनीही स्थानकाची पाहणी केल्याची माहिती महानगर आयुक्त संजय मुखर्जी यांनी दिली. आता आयआयटीतील तज्ज्ञांमार्फत या मेट्रो स्थानकाची तपासणी करण्यात येणार आल्याचेही त्यांनी सांगितले. पुढील आठवड्यात आयआयटीचे तज्ज्ञ पाहणी करणार आहेत. या पाहणीनंतर सुचविण्यात येणाऱ्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

Story img Loader