मुंबई : woman from Mahim allegedly cheated of Rs 24 lakh by cyber fraudster इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या लंडनमधील मित्राने माहीम येथे राहणाऱ्या ३१ वर्षीय महिलेची २४ लाख रुपयांची सायबर फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ‘एमएससी क्रुसेस’ या स्विस-इटालियन क्रूझ कंपनीत वरिष्ठ कार्यकारी असल्याचा बनाव रचून आरोपीने सदर महिलेला विश्वास संपादन केला आणि त्यानंतर तिची फसवणूक केली. याप्रकरणी बँक व्यवहाराच्या आधारे पोलीस अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा >>> शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या नावाखाली ५० लाखांची सायबर फसवणूक

four online scams
डिजिटल अटक ते रोमान्स स्कॅम : ऑनलाइन घोटाळ्यांना लोक कसे बळी पडत आहेत? काय आहेत फसवणुकीचे नवीन प्रकार?
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
digital arrest
‘डिजिटल अरेस्ट’चा मुद्दा पंतप्रधानांकडून अधोरेखित
fraud of 46 lakh with women by cyber thieves
पुणे : सायबर चोरट्यांकडून महिलांची ४६ लाखांची फसवणूक
Offensive video viral of female police sub inspector Nagpur news
महिला पोलीस उपनिरीक्षकाचा आक्षेपार्ह ‘व्हिडिओ व्हायरल’
cyber crime
सायबर गुन्हेगारांकडून खरेदीसाठी आमिष दाखवून फसवणूक
Diwali cleaning, home, theft, house, crime news, mumbai
मुंबई : दिवाळीनिमित्त घरात केलेली साफसफाई पडली महागात, कशी ते वाचा आणि सावध व्हा
Fraud of 34 lakh rupees by getting caught in a honey trap vasai crime news
‘हनी ट्रॅप’ मध्ये अडकवून वृध्दाची फसवणूक; एका अश्लील क्लिपसाठी उकळले ३४ लाख रुपये

तक्रारदार महिला खासगी कंपनीत लेखापाल म्हणून कार्यरत आहे. फेब्रुवारीमध्ये तिला टॉरेस नील नावाच्या व्यक्तीने इन्स्टाग्रामवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. आपण ‘एमएससी क्रुसेस’मध्ये काम करतो आणि लंडनमध्ये राहतो, असे नीलने सांगितले. दोघे इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲपवर नियमितपणे संवाद साधत होते. एका महिना चॅटिंग केल्यानंतर नीलने त्याची मोठी बढती झाल्याचे सांगितले. तो तिच्यासाठी एक खास भेट पाठवत असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने एक पार्सल कुरियरद्वारे मुंबईला पाठवले. त्यात तीन कोटी ३३ लाख रुपये किमतीचे ब्रिटिश पाऊंड असल्याचे सांगतले. त्यानंतर २८  मार्च रोजी दिल्ली सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्याचा महिलेला दूरध्वनी आला. त्यात त्यांच्या नावावर आलेले पार्सल सोडण्यासाठी ४१ हजार ७०० रुपयांचा कर भरावा लागेल, असे सांगण्यात आले.

हेही वाचा >>> धारावी पुनर्विकासात उद्धव ठाकरे सरकारचा निर्णय बदलल्याने एकाधिकारशाही रोखली, देवेंद्र फडणवीस यांचे परखड मतप्रदर्शन

तिने हे पैसे भरल्यानंतर तोतया सीमाशुल्क अधिकाऱ्याने तिला पार्सलमध्ये मोठ्या प्रमाणावर विदेशी चलन असल्यामुळे तिला इतर शुल्कही भरावे लागतील, असे सांगितले. तिने हे पैसे भरल्यानंतर त्याने तिला कुरियर पावती, प्रमाणपत्र,  ट्रेजरी इंटरनॅशनल कोड, टॅक्स क्लिअरन्स चार्जेस, कस्टम्स डेक्लेरेशन आणि ओनरशिप सर्टिफिकेट इत्यादी भरायला भाग पाडले. मार्च २८ आणि जून १४ दरम्यान, महिलेला २४ लाख सात हजार रुपये देण्यास सांगण्यात आले. तिच्याकडे आणखी दोन लाख रुपयांची मागणी करण्यात आल्यानंतर फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आले. काही मित्रांशी चर्चा केल्यानंतर लंडनमधील मित्रही फसवणूक करणाऱ्यांपैकीच असल्याचे तिला समजले. त्यानंतर तिने तात्काळ सायबर पोलिसांकडे जाऊन याबाबत तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी फसवणूक, तोतयागिरी आणि सायबर फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल केला. या फसवणुकीत सराईत नायजेरियन टोळीचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. फसवणुकीची ही जुनी पद्धत असून तक्रारदार महिलेचे पैसे जमा करण्यात आलेल्या बँक खात्यांची माहिती मिळवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानुसार पोलीस अधिक तपास करण्यात येत आहे.