‘आदर्श’ चौकशी आयोगाने ज्या राजकीय नेत्यांवर ठपका ठेवला आहे, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा, अन्यता भारिपप्रणित महाराष्ट्र लोकशाही आघाडीच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा भारिप-बहुज महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिला.
त्यातील शिफारशी अंशत: स्वीकारण्याचा निर्णय म्हणजे ‘डोके नसलेला माणूस’ आहे. राजकीय नेत्यांना अभय देणारा आणि अधिकाऱ्यांना दोषी ठरविणाऱ्या सरकारच्या या निर्णयाचा आंबेडकर यांनी आघाडीच्या वतीने निषेध केला. आदर्शची जमीन राज्य सरकारची असल्याच्या आयोगाच्या निष्कर्षलाही आंबेडकरांनी विरोध केला. केंद्र सरकारचीच ही जमीन आहे. राज्य सरकारला ती हस्तांतरीत करण्यात आल्याचा कोणताही दस्तावेज उपलब्ध नाही. दुसरे असे की, मुंबईतील कोणतीही जमीन हस्तांतरीत करायची असेल तर मुख्यमंत्र्यांची परवानगी हवी, असा आदेश १९६१ मध्ये काढण्यात आला होता. आदर्शबाबतचा निर्णयही मुख्यमंत्र्यांनीच घेतला असणार. मग ज्या-ज्या मुख्यमंत्र्यांचा त्याच्याशी संबंध आहे, त्यांना दोषी ठरविण्याऐवजी अभय दिले जात आहे, अशी टीका त्यांनी केली. आदर्श घोटाळ्यात विरोधी पक्षाचेही काही लोक गुंतले असल्याने विरोधकांकडून त्याविरोधात आवाज उठविला जाईल याबद्दल शंका आहे. परंतु दोषींवर कारवाई केली नाही,राज्यभर आंदोलन केले जाईल, असे त्यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा