माईसाहेब आंबेडकरांच्या नावे योजना प्रस्तावित
समाजातील जातिभेद व असमानतेची दरी दूर करून समाज एकसंध व्हावा, या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजनेत आता आमूलाग्र बदल करण्याचे राज्य सरकारने ठरविले आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या द्वितीय पत्नी डॉ. माईसाहेब आंबेडकर यांच्या नावाने नवीन योजना सुरू करण्यात येणार आहे. त्यानुसार आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना शासकीय नोकरीत प्राधान्य देण्याचा विचार असून तसा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे, अशी माहिती सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.
राज्यात १९५८ पासून आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना सुरू करण्यात आली. सुरुवातीला पती-पत्नीपैकी एक व्यक्ती अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमातीची आणि दुसरी व्यक्ती सवर्ण हिंदू, लिंगायत जैन व शिख यांपैकी असल्यास तो आंतरजातीय विवाह मानला जात होता. २००४ पासून त्याची व्याप्ती पुन्हा वाढविण्यात आली. अनुसू्चित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती यांच्यातील आंतरजातीय विवाहही प्रोत्साहन योजनेत आण्यात आले. त्यानुसार आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना रोख १५ हजार रुपये दिले जात होते. २०१० मध्ये त्यात वाढ करून ही रक्कम ५० हजार रुपये करण्यात आली. आता या योजनेत आणखी बदल करण्यात येणार आहे.
आंतरजातीय विवाह केल्यास सरकारी नोकरीत प्राधान्य
समाजातील जातिभेद व असमानतेची दरी दूर करून समाज एकसंध व्हावा
Written by मधु कांबळे,
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 15-05-2016 at 02:20 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Inter caste marriage benefits in getting government job