पोलिसांचा अशा प्रकरणांमध्ये हस्तक्षेप चुकीचाच असल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ विधिज्ञ श्रीकांत भट यांनी दिली आहे.
या दोन तरुणींनी सोशल नेटवर्किंग साईटवरुन दिलेल्या प्रतिक्रियेने संतापलेला शिवसेना कार्यकर्त्यांचा एक गट पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यासाठी गेला. वास्तविक त्या वेळी पोलिसांनी तक्रार नोंदवणेच चुकीचे होते. उलट त्यांनी त्या गटाला तुम्ही आधी महानगरदंडाधिकाऱ्यांकडे खासगी तक्रार नोंदवा आणि न्यायालयाने आदेश दिले तरच चौकशी केली जाईल, अशी सूचना करणे अपेक्षित होते. परंतु पोलिसांनी तसे न करता तक्रार नोंदवली आणि दोन्ही तरुणींना अटक केली. त्यामुळे पोलिसांची ही कृती चुकीची असल्याचे भट यांनी सांगितले.     

Story img Loader